Mohammed Shami hit Ravi Shastri & Virat Kohli sakal
क्रिकेट

३ मॅच १३ विकेट्स! आणखी काय करायला हवं होतं? Mohammed Shami चा विराट-शास्त्रींना अप्रत्यक्ष सवाल

Swadesh Ghanekar

Mohammed Shami criticize team management - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ५५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे आणि आशियाचा तिसरा गोलंदाज आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट्स अशी चारवेळा कामगिरी करणारा शमी एकमेव गोलंदाज आहे. तरीही त्याला मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने जागा मिळवता आलेली नाही. भारताने मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धेत २८ सामने खेळले आणि त्यापैकी १८ सामन्यांत शमीला संधी मिळाली व त्यात १५ सामने भारताने जिंकले.

२०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणेच मोहम्मद शमीला २०१९च्या वर्ल्ड कपमध्येही पहिल्या चार सामन्यांत बाकावर बसवून ठेवले गेले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ त्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. शमीला त्या वर्ल्ड कपमध्ये पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली. त्यात त्याने हॅटट्रिक घेतली आणि नंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. चार सामन्यांत त्याने १४ विकेट्स घेतल्या होत्या, तरीही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात विश्रांती दिली गेली. उपांत्य फेरीतही त्याला संधी मिळाली नाही.

२०२३ च्या वर्ल्ड कपमध्येही हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीलाल संधी मिळाली आणि त्याने ७ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या. त्यात दोन वेळा त्याने डावात पाच विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर शमीने नाराजी व्यक्त केली. या निर्णयाने मी कन्फ्युज झाल्याचेही त्याने म्हटले.

''२०१९ मध्ये मी पहिले ४-५ सामने खेळलो नव्हतो. पुढील सामन्यात मी हॅटट्रिक घेतली आणि त्यानंतर पाच व ४ विकेट्स घेतल्या. २०२३च्या वर्ल्ड कपमध्येही हेच घडले. सुरुवातीचे काही सामने मी खेळलो नाही आणि त्यानंतर पाच विकेट्स घेतल्या, नंतर ४ व ५ विकेट्स घेतल्या,''असे शमीने युट्यूब चॅनेलवर सांगितले.

"मला एकाच गोष्टीचे आजही आश्चर्य वाटते, ते म्हणजे प्रत्येक संघाला चांगली कामगिरी करू शकतील अशा खेळाडूंची गरज असते. मी तीन सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या. तुम्ही माझ्याकडून आणखी काय अपेक्षा करता? माझ्याकडे ना प्रश्न आहेत ना उत्तर... मी तेव्हाच स्वत:ला सिद्ध करू शकतो जेव्हा तुम्ही मला संधी द्याल. तू मला संधी दिली आणि मी तीन सामन्यांत १३ बळी घेतले. त्यानंतर आम्ही न्यूझीलंडकडून हरलो. २०१९ मध्ये एकूण चार सामन्यांत मी १४ विकेट्स घेतल्या. २०२३ मध्ये मी सात सामन्यांत २४ विकेट घेतल्या,” असेही तो पुढे म्हणाला.

२०२३च्य वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या मोहम्मद शमीने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT