Mohammed Shami on Ball Tampering Allegation by Inzamam sakal
क्रिकेट

पाकिस्तानी खेळाडूंनी कार्टून'गिरी बंद करावी! Mohammed Shami फुल्ल मूडमध्ये, माजी कर्णधारचा घेतला समाचार

Kiran Mahanavar

Mohammed Shami on Ball Tampering Allegation by Inzamam : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने भारतीय संघावर केलेल्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. इंझमाम टी-20 वर्ल्ड कप-2024 दरम्यान म्हणाला होता की, टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चेंडू रिव्हर्स स्विंग होत आहे जे शक्य नाही. याबाबत शमीने इंझमामला फटकारले आहे. आणि शमीने एकदिवसीय वर्ल्ड कप-2023 दरम्यान पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या आरोपांनाही मूर्खपणाचे म्हटले आहे.

यूट्यूबर एकाच्या चॅनलवर बोलताना शमी म्हणाला की, पाकिस्तान भारतीय संघावर कधीच खूश नसतो आणि कधीच होणार नाही. पण काही म्हणतात की आम्हाला वर्ल्ड कपमध्ये वेगळा चेंडू देण्यात आला होता तर काही म्हणतात की आम्ही ज्या चेंडूने गोलंदाजी करतो त्या चेंडूला चिप असते. मी यापूर्वी असेही म्हटले आहे की जर मला भविष्यात कधी संधी मिळाली किंवा असा प्लॅटफॉर्म मिळाला तर मला तिथे बॉल उघडून दाखवायला आवडेल की बॉलच्या आत काही आहे की नाही.”

शमी पुढे म्हणाला की, "जर तुमच्या गोलंदाजांनी स्विंग आणि रिव्हर्स स्विंग केला तर ती क्षमता आहे आणि जर आम्ही तसे केले तर ते चेंडूशी छेडछाड करत आहेत किंवा त्यांनी चेंडूच्या आत चिप टाकली आहे."

शमीने इंझमामला प्रत्युत्तर देताना म्हटले की, त्याने मूर्खपणाचे बोलून जनतेला मूर्ख बनवणे थांबवावे. समजा, मी बॉलमध्ये एखादे उपकरण ठेवले आणि बटण उलट दाबले तर मी इनस्विंग टाकतो आणि चेंडू स्विंग आऊट झाला, तर चौकार जाईल. या कार्टून गिरी बंद करा, हे लोकांना मूर्ख बनवण्याच्या गोष्टी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT