MS Dhoni Kavya Maran esakal
क्रिकेट

IPL 2025 Auction : महेंद्रसिंग धोनीसाठी CSK ने नियमात बदल करण्याचा जोर धरला, काव्या मारनने विरोध केला

Swadesh Ghanekar

IPL 2025 Uncapped Player MS Dhoni: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून चेन्नई सुप किंग्सच्या ताफ्यात कायम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयपीएलमधील यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या CSK ने जुना नियम पुन्हा आणण्याचा प्रस्ताव BCCI समोर ठेवला आहे.

आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्यात मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत CSK ने जुना नियम पुन्हा आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि हा नियम २००८ ते २०२१ या कालावधीत अस्तित्वात होता. या नियमानुसार ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ५ किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष झाली आहेत, त्याचा विचार अनकॅप्ड खेळाडू म्हणून केला जात होता. पण, CSK वगळता हा नियम पुन्हा आणण्यास कोणत्याही फ्रँचायझी तयार नाही.

धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आयपीएल २०२२साठी झालेल्या लिलावात CSK ने दुसऱ्या फळीतील खेळाडू म्हणून धोनीला रिटेन केले. रवींद्र जडेजाला त्यांनी रिटेन लिस्टमध्ये पहिली पसंती दिली होती. त्या वर्षी अनकॅप्ड खेळाडूला ४ कोटींत फ्रँचायझीने रिटेन केले होते. आयपीएलच्या याही पर्वात जर अनकॅप्ड खेळाडूसाठी हिच रक्कम कायम ठेवल्यास CSK याच नियमाप्रमाणे धोनीला रिटेन करू शकतात. पण, अन्य फ्रँचायझी निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून विचार करण्याच्या बाजूने नाहीत.

काव्या मारनचा विरोध..

सनरायझर्स हैदराबादची मालकिण काव्या मारन हिने निवृत्त खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करणे हा त्याचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले. त्यापेक्षा लिलावात ते जास्त रक्कम घेऊ शकतात. ती म्हणाली की, लिलावात आपल्या संघात घेतलेल्या अनकॅप्ड खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केलेल्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर ते "चुकीचे उदाहरण" ठरेल. निवृत्त खेळाडूंनी लिलावाचा भाग व्हावे जिथे त्यांना योग्य रक्कम मिळेल.

महेंद्रसिंग धोनी खेळणार का?

४३ वर्षीय धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का, हा प्रश्न आता पुन्हा समोर येत आहे. मागील काही पर्वांतही अशीच चर्चा रंगली होती. २०२३ मध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेलली आणि त्याने आयपीएल २०२४चे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवले. तो फार कमी चेंडू या पर्वात खेळला, परंतु त्यातही त्याने चौकार-षटकार खेचले. काही दिवसांपूर्वी धोनी हेही म्हणालेला, बीसीसीआयचा रिटेन नियम काय ठरतो, यानंतर माझा निर्णय जाहीर करेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT