MS Dhoni wishes to Anant Ambani and Radhika Merchant: बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अखेर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडला.
यानंतर शनिवारी (१३ जुलै) शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. दरम्यान, या लग्नासंबंधित जवळपास सर्वच सोहळ्यांसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी उपस्थित होते.
दरम्यान, शुभ आशीर्वाद सोहळ्यानंतर धोनी या पती-पत्नीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
एमएस धोनी अनंत आणि राधिका यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने या फोटोला उंगली पकड के तूने... हे बाप-लेकीचं नात्यावरील गाणं बॅकग्राऊंडला लावले आहे. हे गाणं राधिकाचे वडील विरेन मर्चंट यांच्यासाठी असल्याचेही सांगितले आहे.
धोनीने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'राधिका, तुझे तेजस्वी हास्य कधीही मावळू नये. अनंत तू ज्याप्रमाणे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाशी प्रेम आणि दयाळूपणे वागतोस, त्याचप्रमाणे प्लीज राधिकाची काळजी घे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरले असो. तुमचे अभिनंदन आणि लवकरच भेटू. हे गाणं विरेन काकांसाठी.'
धोनीव्यतिरिक्त त्याची पत्नी साक्षीनेही अनंत आणि राधिका यांना पोस्ट शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहे.
धोनी आणि साक्षी यांनी यापूर्वी राधिका आणि अनंत यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यालाही हजेरी लावलेली होती. त्याचबरोबर लग्नाच्या दिवशी धोनी वरातीत नाचतानाही दिसला होता. त्याचा नाचतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.
दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी केवळ धोनीच नाही, तर गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, इशान किशन, ऋषभ पंत, के श्रीकांत, स्मृती मानधना, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर असे अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते.
इतकेच नाही, तर जॉन सीनापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक जगभरातील सेलिब्रेटीही या लग्नासाठी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.