Paras Mhambrey as Mumbai Indians Bowling Coach Sakal
क्रिकेट

Mumbai Indians संघात जयवर्धने पाठोपाठ आणखी एका जुन्या शिलेदाराची एन्ट्री! सांभाळणार 'ही' जबाबदारी

Paras Mhambrey as Mumbai Indians Bowling Coach: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ आधी जोरदार तयारी सुरू केली असून काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षकपदी माहेला जयवर्धनेची फेरनियुक्ती केली होती. आता आणखी एका जुन्या सदस्याचा संघात समावेश केला आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians: पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघात १८ व्या हंगामापूर्वीच मोठे बदल होताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये जुन्या शिलेदारांचे पुनरागमन होत आहे.

काहीदिवसांपूर्वी तीनवेळा मुंबईला आयपीएल विजेतेपद जिंकून देणारा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता बुधवारी पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पारस म्हाम्ब्रे यांचे मुंबई इंडियन्स संघात हे पुनरागमन आहे. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१३ दरम्यानही या संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम पाहिले आहे.

आता यावेळी म्हाम्ब्रे जयवर्धनेच्या कोचिंग स्टाफमध्ये लसिथ मलिंगासोबत काम करतील. मलिंगाही मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यामुळे आता मलिंगा आणि म्हाम्ब्रे आयपीएल २०२५ साली एकत्र काम करतील.

म्हाम्ब्रे यांनी यापूर्वी भारतीय संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षकपद नोव्हेंबर २०२१ ते जून २०२४ दरम्यान सांभाळले आहे. त्यांचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश होता. त्यामुळे टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्यानंतर द्रविड सोबतच म्हाब्रे यांचाही भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आहे.

विशेष म्हणजे द्रविडसोबत असलेल्या कोचिंग स्टाफमधील चारपैकी तिघांचे आयपीएलमध्ये आता पुनरागमन होत आहे. काही दिवसांपूर्वीच द्रविडने राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे, तर विक्रम राठोड हे देखील राजस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक झाले आहेत.

आता म्हाब्रे मुंबई इंडियन्स संघात दाखल झाले, तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांना बीसीसीआयने कायम केले आहे. त्यामुळे सध्या ते भारतीय संघासोबतच आहेत.

त्याचबरोबर म्हाम्ब्रे यांनी भारत अ संघाचे आणि १९ वर्षांखालील संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षकपद २०२१ नोव्हेंबरपर्यंत सांभाळले होते.

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी पारस म्हाब्रे यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली होती.

त्यांनी भारतासाठी २ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळलेत. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फार मोठी नसली, तरी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. त्यांनी ९१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २८४ विकेट्स घेतल्या, तसेच १६६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ८३ लिस्ट अ सामन्यात १११ विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, येत्या काही दिवसात आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव होईल. त्याआधी मुंबई इंडियन्सने सपोर्ट स्टाफमध्ये केलेले बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT