SL vs Nz  esakal
क्रिकेट

SL vs NZ 2nd Test : न्यूझीलंड ८८ धावांत तंबूत, श्रीलंकेकडे ५०० पार आघाडी; Prabath Jayasuriya ची आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

Sri Lanka vs New Zealand 2nd Test : श्रीलंका क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे

Swadesh Ghanekar

Sri Lanka vs New Zealand 2nd Test Prabath Jayasuriya: श्रीलंका क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या डाव ५ बाद ६०२ धावांवर घोषित केल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ शंभरच्या आत गुंडाळला. फिरकीपटू प्रभात जयसूर्याने कमाल करून दाखवली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात सर्वाधिक धावांची आघाडी घेणाऱ्या क्रमवारीत श्रीलंका पाचव्या स्थानावर आले आहेत. त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आहे.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५ बाद ६०२ धावांचा डोंगर उभा केला. दिनेश चंडिमल ( ११६), कमिंदू मेंडिस ( १८२ ) आणि कुसल मेंडिस ( नाबाद १०६) यांनी शतकी खेळी केली. कमिंदूने अनेक विक्रम मोडले. त्याने २५० चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व ४ षटकार खेचले. या शतकवीरांव्यतिरिक्त अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने ८८ धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने ( ४६ ) व कर्णधार धनंजया सिल्वा ( ४४) यानेही हातभार लावला. ग्लेन फिलिप्सने ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात आलेल्या किवींना धक्क्यांमागून धक्के बसले. टॉम लॅथम ( २) , डेव्हॉन कॉनवे ( ९), केन विलियम्सन ( ७), अजाझ पटेल ( ८) हे आघाडीचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. यापैकी दोघांना जयसूर्याने माघारी पाठवले, तर असिथा फर्नांडो व निशान पेइरिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. रचीन रविंद्र ( १०) व डॅरिल मिचेल ( १३) यांनी पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही अनुक्रमे निशान व जयसूर्याने माघारी पाठवले.

टॉम बंडल ( १ ) व ग्लेन फिलिप्स ( ०) यांना बाद करून जयसूर्याने डावात पाच विकेट्स पूर्ण केल्या. कारकीर्दितील पहिल्या १६ कसोटीतील ही त्याची ९ वी वेळ आहे त्याने डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमात त्याने आर अश्विनशी बरोबरी केली, परंतु क्लॅरी ग्रिमेट ( १०) अव्वल स्थानी आहे. सुभाष गुप्तेला ( ८) त्याने मागे टाकले. श्रीलंकेकडून सर्वाधिक डावात पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो १६ कसोटीतच चौथ्या क्रमांकावर आला आहे. मुथय्या मुरलीधरन ( ६७), रंगना हेरथ ( ३४) व चमिंडा वास ( १२) हे पुढे आहेत.

निशानने शेवटची विकेट घेऊन न्यूझीलंडचा पहिला डाव ८८ धावांवर गुंडाळला आणि ५१४ धावांची आघाडी घेतली. जयसूर्याने ४२ धावांत ६ विकेट्स घेतल्या, तर निशानने ३ बळी टिपले.

कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक आघाडी घेणारे संघ

  • ७०२ इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल १९३८

  • ५८७ दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका, कोलंबो एसएससी २००६

  • ५७० पाकिस्तान वि. न्यूझीलंड, लाहोर २००२

  • ५६३ इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, किंग्स्टन १९३०

  • ५१४ श्रीलंका वि. न्यूझीलंड, गॅले २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT