IND vs NZ esakal
क्रिकेट

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

सकाळ डिजिटल टीम

IND vs NZ Test series: भारताविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड संघ आज भारतामध्ये रवाना झाला आहे. ही मालिका १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व टॉम लॅथम करणार आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी लक्षात घेता न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमसाठी ही जबाबदारी सोपी असणार नाही. भारताला रवाना होण्यापूर्वी लॅथमने भारताविरुद्ध आखलेल्या रणनीतीचा उलघडा केला आहे.

लॅथम भारताविरूद्धच्या मालिकेबद्दल बोलताना म्हणाला, "भारताचा दौरा नेहमीच रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. आशा आहे की आम्ही तिथे थोडे अधिक मोकळेपणाने आणि धैर्याने खेळू आणि भारतावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करू. जर आम्ही असे केले तर आम्हाला जिंकण्याची चांगली संधी आहे."

भारताला हरवण्याचा मार्ग आहे

भारताने घरच्या मैदानावर सलग १८ कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर न्यूझीलंड जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील सलग चार मालिका गमावल्यानंतर भारताविरूद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत भारतात केवळ दोनच कसोटी सामने जिंकले आहेत. यातील शेवटचा विजय त्यांनी १९८८ मध्ये मिळवला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघ यावेळी योग्य रणनीतीसह भारतात आला आहे.

लॅथम म्हणाला,"आम्ही निरिक्षण केले की ज्या संघांनी यापूर्वी भारतात चांगली कामगिरी केली, त्यांनी आक्रमक खेळ करून भारताविरूद्ध विजय मिळवला होता. विशेषत: फलंदाजीत बचावात्मक न खेळता आक्रमक क्रिकेट खेळणे महत्त्वाचे ठरेल."

नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात न्यूझीलंडला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु कर्णधार लॅथम म्हणाला की या मालिकेत त्याच्यासाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. "श्रीलंकेत आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली. निकाल आमच्या बाजूने लागला नसला तरी आम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या. फलंदाजीतील एक डाव वगळता उर्वरित डावात आम्ही चांगली कामगिरी केली."

न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धा २०१९-२० चे विजेतेपद पटकावले होते. परंतु, त्यानंतर न्यूझीलंड संघाने कसोटीमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. केन विल्यमसनने कर्णधारपद सोडल्यानंतर टीम साऊदी कसोटी कर्णधार झाला आणि आता टॉम लॅथमकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूर्णवेळ कर्णधार म्हणून टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड भाराताविरूद्ध पहिली कसोटी मालिका खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

Air India Flight: हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकला! 140 प्रवाशांसह दोन तासांनी सुरक्षित लँडिंग

SCROLL FOR NEXT