Chris Gayle Sakal
क्रिकेट

On This Day: फक्त टी२०चा सुपरस्टार नाही, तर कसोटीतही दाखवलाय 'युनिवर्स बॉस'ने इंगा; १०३ टेस्ट खेळताना ठोकलीत दोन त्रिशतकं

Chris Gayle Career: ख्रिस गेल शनिवारी त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्याबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

On This Day Chris Gayle Birthday: विस्फोटक फलंदाजी म्हटलं की एक नाव क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर नक्की येतं, ते नाव म्हणजे ख्रिस गेल. युनिवर्स बॉस या टोपन नावाने ओळखला जाणाऱ्या गेलचा शनिवारी (२० सप्टेंबर) ४५ वा वाढदिवस आहे.

वेस्ट इंडिजचा दिग्गज सलामीवीर असलेला ख्रिस गेलचा जन्म जमैकामधील किंग्सटन येथे २१ सप्टेंबर १९७९ रोजी झाला. गेलचं पूर्ण नाव ख्रिस्तोफर हेन्री गेल असं आहे. दरम्यान गेल हा टी२० क्रिकेटमधील सुपरस्टार समजले जाते. पण त्याच्या इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नव्हता.

गेलच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्याला आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी अनेकदा कचराही उचलावा लागला होता. पण क्रिकेटची आवडीने त्याला तारलं. त्याला लुकास क्रिकेट क्लबनेही पाठिंबा दिला.

गेलही म्हटला आहे की जर हा क्लब नसता तर कदाचीत तो रस्त्यावर राहिला असता. त्याने त्यानंतर १९९८-९९ हंगामातून वयाच्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याचं हे पदार्पण जमैका संघासाठी झालं.

यानंतर लगेचच गेलला १९९९ मध्ये भारताविरुद्ध टोरोंटोला झालेल्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीतही पदार्पण केले.

मात्र सुरुवातीची काही वर्षे गेलसाठी फारशी चांगली नव्हती. पण २००२ साली त्याने त्याच्यातील क्षमता दाखवून दिली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतकं ठोकली, ज्यात कसोटीतील द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने त्यावर्षी २००० हून अधिक धावा काढल्या.

त्यानंतर मात्र गेलने मागे वळून पाहिले नाही. मात्र त्याला आरोग्याच्या समस्या जाणवल्या. त्याच्या हृदयाचे अनियमित ठोके होते, ज्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्यावर उपचार केल्यानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये परतला. गेल हा एक टी२० स्टार म्हणून ओळखला जात असला, तरी अनेकांना हे माहित नसेल की त्याने १०० हून अधिक कसोटी सामने देखील खेळले आहेत.

त्याने कसोटीत १०३ सामन्यांमध्ये १५ शतके आणि ३७ अर्धशतकांसह ७२१४ धावा केल्या आहेत. त्याने दोन त्रिशतकेही झळकावली आहेत. त्याची ३३३ धावा ही सर्वोच्च खेळी राहिली असून ती त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१० साली गॉल येथे केली होती.

गेलने वनडेत ३०१ सामने खेळताना २५ शतके आणि ५४ अर्धशतकांसह १०४८० धावा केल्या. तो वेस्ट इंडिजचा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ७९ सामन्यांमध्ये २ शतकांसह १८९९ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तो वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

तो जसा चांगला फलंदाज आहे, तसा तो चांगला गोलंदाजही आहे. त्याने कसोटीत ७३ विकेट्स घेतल्या, तर वनडेमध्ये १६७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.

गेलने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो टी२० क्रिकेटकडे वळला आणि त्याने या प्रकाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याने त्याच्या कारकि‍र्दीत २० हून अधिक संघांसाठी टी२० क्रिकेट खेळले.

त्याने ४६३ टी२० सामने खेळताना १४५६२ धावा केल्या, ज्यात तब्बल २२ शतकांचा आणि ८८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ११३२ चौकार आणि १०५६ षटकार मारले आहेत. त्याने ८३ विकेट्सही घेतल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.

गेलने २००७ साली टी२० वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळवला गेला होता, तेव्हा पहिल्याच सामन्यात शतक केलं होतं.

त्याने २०१३ आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाछी खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याने जलद शतक, सर्वोच्च खेळी असे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले होते. इतकेच नाही, तर गेलने २०१५ वनडे वर्ल्ड कपमध्ये २१५ धावांची द्विशतकी खेळीही केली होती.

गेलने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून २००९ मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो २०११ ते २०१७ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग राहिला. या संघासाठी त्याने अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्याने २०१८ ते २०२१ दरम्यान पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले.

त्यानंतर गेल आयपीएल खेळला नाही. त्याने आयपीएलमध्ये १४२ सामन्यांमध्ये ४९६५ धावा केल्या. यामध्ये ६ शतकांचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश होता. त्याने आयपीएलमध्ये १८ विकेट्सही घेतल्या.

तो केवळ आयपीएलच नाही, तर कॅरेबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, एझांसी सुपर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग, विटॅलिटी ब्लास्ट अशा अनेक टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळला आहे.

दरम्यान, गेलने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये खेळला. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबीमध्ये अखेरचा टी२० सामना खेळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT