Cricket Sakal
क्रिकेट

Match Fixing: खळबळजनक! मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे श्रीलंकेत संघमालकाला अटक

मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली लंका प्रीमियर लीगमधील एका संघमालकाला अटक करण्यात आल्याचे समजत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Match Fixing: क्रिकेट खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे नागरिकत्व असलेला मूळ बांगलादेशी तमिम रेहमान हा लंका प्रीमियर लीगमधील दांबुला थंडर्स संघाचा मालक आहे. त्याला मॅच फिक्सिंगसंदर्भातील संयशास्पद हालचालींमुळे अटक करण्यात आली आहे.

श्रीलंका क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास टीमने रेहमान याला अटक केली असल्याचे समजत आहे. कोलंबो दंडाधिकारी न्यायालयाने त्याला ३१ मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

लंका प्रीमियर लीगमध्ये इम्पिरियल स्पोर्टस ग्रुपने दांबुला संघाची मालकी एप्रिल महिन्यात घेतली. ही कंपनी बांगलादेशातील आहे.

बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेहमानला न्यायालयाच्या निर्णयानंतर अटक करण्यात आली. त्याची मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी करणे या आरोपांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. श्रीलंका प्रीमियर लीग १ ते २१ जुलैदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

कोलंबोमध्ये मान्यता नसलेली लिजेंटस क्रिकेट लीग झाली. त्यात मॅचफिक्सिंग केल्याच्या आरोपांमुळे योनी पटेल आणि पी. आकाश या भारतीय नागरिकांचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश श्रीलंकेतील न्यायालयाने दिले आहेत.

यातील पटेल हा एका संघाचा मालक आहे. ते दोघेही सध्या जामीनावर सुटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT