PAK vs ENG esakal
क्रिकेट

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी बॉलरचा ‘पोपट’ झाला! चेंडू स्टम्पला लागला, Harry Brook तरीही नाबाद राहिला, Video

Swadesh Ghanekar

Harry Brook remain not out even ball hists stumps : पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ५५६ धावांना इंग्लंडकडून सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडले होते. त्याचा वचपा काढताना इंग्लंडकडून Joe Root आणि हॅरी ब्रूक यांनी शतक झळकावले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने ८६ षटकांत ३ बाद ४२९ धावा केल्या आहेत. या दोघांची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाजांची धडपड पाहायला मिळतेय आणि त्यातच गोलंदाज आमेर जमाल याचा पोपट झालेला पाहायला मिळाला.

अब्दुल्लाह शफिक ( १०२), कर्णधार शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४) यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार व सलामीवीर ऑली पोप भोपळ्यावर माघारी परतला. पण, जो रूट व झॅक क्रॉली मैदानावर उभे राहिले. रूट व क्रॉलीची १०९ धावांची भागीदारी शाहिन शाह आफ्रिदीने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तोडली. क्रॉली ८५ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ७८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रूट व बेन डकेट या जोडीने पाकिस्तानचे टेंशन वाढवले. त्यांची तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या.

डकेटचे शतक हुकले. तो ७५ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८४ धावांवर बाद झाला. रूट व डकेट यांनी प्रथमच कसोटीत शतकी भागीदारी केली. रूटने विक्रमांचा पाऊस पाडताना दीडशतक पूर्ण केले आणि हॅरी ब्रूकनेही पाकिस्तानी गोलंदाजांना झोडले. रूटने २३६ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १५२ धावा केल्या आणि ब्रूक १२६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह १०९ धावांवर खेळतोय.. दरम्यान, आमेरच्या गोलंदाजीवर चेंडू ब्रूकच्या हेल्मेटला लागून यष्टिंवर आदळला होता. आमेरने विकेट मिळाली म्हणून आनंद साजरा करण्याची तयारी केली होती. पण, बेल्स पडल्या नाही आणि ब्रूक नाबाद राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : रतन टाटा यांची प्रकृती स्थिर

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT