ENG vs PAK eskal
क्रिकेट

PAK vs ENG 1st Test : हाय रे किस्मत! पाकिस्तान, ५५६ धावा करूनही हरणारा जगातला पहिला संघ; इंग्लंडचा पराक्रम

Pakistan vs England 1st Test : पहिल्या डावात ५५६ धावा केल्यानंतर बॅकफूटवर जाऊ असा विचार पाकिस्ताननेही केला नसावा. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना जोर का झटका दिला. जो रूट व हॅरी ब्रूक यांनी अनुक्रमे द्विशतक व त्रिशतक झळकावून संघाला ८२३ धावांचा डोंगर उभा करून दिला.

Swadesh Ghanekar

PAK vs ENG 1st Test WTC 2023-25: इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. दोघांनी वन डे स्टाईल फलंदाजी करताना ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. रूटच्या २६२ धावा आणि ब्रूकच्या ३१७ धावांच्या खेळीने इंग्लंडला ७ बाद ८२३ धावांचा डोंगर उभा करून दिला. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा करूनही इंग्लंडने जबरदस्त पलटवार केला आणि २६७ धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानचा दुसरा डाव चौथ्या दिवशी गडगडला आणि सहा विकेट्स पडल्याने डावाने पराभव टाळण्याची त्यांची धडपड सुरू झाली.पण, त्यांना अपयश आले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात पाचशे धावा करूनही पराभूत होणारा पाकिस्तान हा पहिला संघ आहे.

Joe Root - Harry Brook रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी

अब्दुल्लाह शफिक ( १०२), शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४*) यांच्या शतकांनी पाकिस्तानला पहिल्या डावात ५५६ धावांपर्यंत पोहोचवले. पण, सपाट खेळपट्टीवर इंग्लंडकडूनही पलटवार होईल, हे अपेक्षित होतेच.. जो रूट व हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचे कंबरडे मोडले. झॅक क्रॉली ( ७८) व बेन डकेट ( ८४) यांच्यानंतर रूट व ब्रूक यांनी मोर्चा सांभाळला. रूटने ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा केल्या आणि ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. ब्रूकने ३२२ चेंडूंत २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावांची वादळी खेळी केली. त्याने कसोटीतील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर केले. इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ८२३ धावांवर घोषित केला.

बाबर आझमचे अपयश अन्...

दडपणाखाली गेलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात विकेट फेकल्या. किंग बाबर आजम पुन्हा एकदा ( ५) अपयशी ठरला. गस अॅटकिन्सन आणि ब्रेडन कार्स यांनी चौथ्या दिवशी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स व जॅक लीच यांच्या प्रत्येकी १ विकेटने पाकिस्तानची अवस्था ६ बाद ८२ धावा केली. पण, सलमान आघा व आमेर जमाल ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि शतकी भागीदारी करून संघासाठी लढली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जॅक लिचने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. सलमान आघाला ( ६३) पायचीत करून जमालसोबतची १४६ चेंडूंत १०९ धावांची भागीदारी लिचने तोडली. त्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीला ( १०) कॉट अँड बोल्ड आणि नसीम शाह ( ६) यांना बाद करून लिचने पाकिस्तानला नमवले. अब्रार अहमद जखमी असल्याने मैदानावर आला नाही आणि पाकिस्ताचा डाव २२० धावांवर गडगडला. Pakistan becomes the first team to lose a Test by an innings after scoring 500+ in the first innings.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT