Harry Brook double century esakal
क्रिकेट

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तानच्या ६ गोलंदाजांची 'Century'! इंग्लंडसमोर लाचारी,ही तर झिम्बाब्वेपेक्षा बेक्कार कामगिरी

Pakistan vs England 1st Test: पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी संघाची कामगिरी पाहून कपाळावर हात नक्की मारला असेल. पहिल्या डावात ५५६ धावा केल्यानंतर इंग्लंडकडून असा पलटवार होईल, याचे स्वप्नही त्यांनी पाहिले नसावे. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी अनुक्रमे त्रिशतक व द्विशतक झळकावून पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोप दिला.

Swadesh Ghanekar

PAK vs ENG 1st Test Harry Brook Joe Root: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील २७ वर्षांत डावात ८०० हून अधिक धावा करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. मुलतान कसोटीत पाकिस्तानच्या ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात इग्लंडने ७ बाद ८२३ धावांव डाव घोषित केला आणि पहिल्या डावात २६७ धावांची मोठी आघाडी घेतली. हॅरी ब्रूकचे त्रिशतक आणि जो रूटचे द्विशतक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना हैराण केले. दुसऱ्या डावात पाकिस्तानने ४१ धावांत ४ गडी गमावले आहेत. Babar Azam अवघ्या ३ धावा करून माघारी परतला.

५५६ धावा चोपल्यानंतर निर्धास्त झालेल्या पाकिस्तानची जो रूट व हॅरी ब्रूक या जोडीने झोप उडवली. जो रूटने ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा केल्या. ही त्याची कसोटी कारकीर्दितली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रूट व ब्रूक या जोडीने ५५२ चेंडूंत ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. हॅरी ब्रूकने त्याच्या कसोटीतील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रूपांतर केले. त्याने ३२२ चेंडूंत २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावा चोपल्या. १९९० नंतर ( ग्रॅमम गूच) हे इंग्लंडच्या फलंदाजाने केलेले पहिले तिहेरी शतक ठरले.

पाकिस्तानविरुद्ध कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम हॅरी ब्रूकने आज नावावर केला. यापूर्वी १९५४ मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत डेनिस कॉम्प्टनने २७८ धावा केल्या होत्या. २०२० मध्ये झॅक क्रॉली ( २६७) या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता, परंतु आज ब्रकने ३१७ धावा करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

इंग्लंडच्या ७ बाद ८२३ धावा हा २१ व्या शतकातील पुरुष कसोटी क्रिकेटमधील एका डावातील सर्वोत्तम धावा ठरल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील या चौथ्या सर्वोत्तम धावा आहेत.

  • ६ बाद ९५२ डाव घोषित - श्रीलंका वि. भारत, कोलंबो १९९७

  • ७ बाद ९०३ डाव घोषित - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, ओव्हल १९३८

  • सर्वबाद ८४९ धावा - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, किंग्स्टन १९३०

  • ७ बाद ८२३ डाव घोषित - इंग्लंड वि. पाकिस्तान, मुलतान २०२४

  • ३ बाद ७९० डाव घोषित - वेस्ट इंडिज वि. पाकिस्तान, किंग्स्टन १९५८

पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांचे शतक...

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सहा गोलंदाजांनी १०० हून अधिक धावा देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००४ मध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या सहा गोलंदाजांविरुद्ध प्रत्येकी १०० धावा चोपल्या होत्या. आज पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांनी शंभरहून अधिक धावा दिल्या.

  • शाहिन शाह आफ्रिदी : २६-१-१२०-१

  • नसीम शाह : ३१-०-१५७-२

  • अब्रार अहमद : ३५-०-१७४-०

  • आमेर जमाल : २४-०-१२६-१

  • सलमान आघा : १८-०-११८-१

  • सईम आयुब :१४-०-१०१-१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT