Usman  esakal
क्रिकेट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Usman Khan fastest double century: पाकिस्तानचा फलंदाज उस्मान खान याने आज वेगवान द्विशतक झळकावून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Swadesh Ghanekar

Pakistan Usman Khan fastest double century: पाकिस्तानचा फलंदाज उस्मान खान याने देशाच्या लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर केला. त्याने एसएनजीपीएल विरुद्ध एहसाल असोसिएट्ससाठी प्रेसिडेंट चषक सामन्यात  १३१ चेंडूंत द्विशतकाचा टप्पा ओलांडला.

हा विक्रम नोंदवल्यानंतर उस्मान खान पुढच्याच चेंडूवर रिटायर्ट हर्ट झाला.  सर्वात वेगवान २०० धावा करण्याचा यापूर्वीचा विक्रम शरजील खानच्या नावावर होता, ज्याने हा टप्पा गाठण्यासाठी १३३ चेंडू खेळले होते. उस्मानने आतापर्यंत खेळलेल्या १० लिस्ट ए मॅचेसमध्ये ८१.५ च्या सरासरीने ६५२ धावा केल्या आहेत.

फखर जमान, आबिद अली, मोहम्मद अली, शर्जील खान, कामरान अकमल आणि खालिद लतीफ यांच्यानंतर पाकिस्तानकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये दिव्शतक झळकावणारा उस्मान आता सातवा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.

पाकिस्तानकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

  • फखर जमान – २१० नाबाद

  • आबिद अली – २०९ नाबाद

  • मोहम्मद अली – २०० नाबाद

  • शरजील खान – २०६

  • खालिद लतीफ – २०४ नाबाद

  • उस्मान खान – २०१

  • कामरान अकमल – २००

  • उस्मान खानने या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानकडून पदार्पण केले होते. १० सामन्यांत त्याने ११७ धावा केल्या आहेत.

फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर, एसएनजीपीएल आणि ईशाल असोसिएट्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ईशाल असोसिएट्सने ४८.४ षटकांत सर्वबाद ३५१ धावा केल्या. उस्मान खानने लिस्ट-अ मध्ये पहिले द्विशतक झळकावले. त्याने १६ चौकार आणि १३ उत्तुंग षटकार ठोकले. त्याने कर्णधार हैदर अली ( ४१ धावा ) सोबत चौथ्या विकेटसाठी १२२ धावा जोडल्या.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफाक अहमदने ३६ चेंडूंत ६८ धावा केल्या. एसएनजीपीएलच्या मोहम्मद अलीने ४५  धावांत पाच गडी बाद केले. प्रत्युत्तरात एसएनजीपीएलने १३५  धावांत त्यांचा निम्मा संघ गमावला होता. पण, मोहम्मद आफ्रिदी ( ११२), अराफत मिन्हास ( ५९), कासिम अक्रम ( ४५) व कामरान गुलाम ( ३९) यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनाही ४७.५ षटकांत सर्वबाद ३५१ धावा करता आल्याने सामना ड्रॉ राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT