PCB T20 WC Team Announcement : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपला 18 सदस्यांचा टी 20 संघ घोषित केला. मात्र हा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ नाहीयेय त्यांनी इंग्लंड आणि आयर्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी संघ निवडला आहे. आयसीसीने वर्ल्डकपचा संघ घोषित करण्याची शेवटची तारीख ही 1 मे अशी ठेवली होती. मात्र पाकिस्ताननं अजून आपला संघ घोषित केलेला नाही.
पाकिस्तानने संघातील खेळाडूंचा फिटनेस आणि सध्याची कामगिरी याबाबत चिंता असल्यानं पीसीबीने टी 20 वर्ल्डकपचा संघ घोषित करण्यास उशीर करत आहे. पाकिस्तान आता आपला संघ इंग्लंडविरूद्धचा पहिला टी 20 सामना झाल्यावर घोषित करणार आहे. हा सामना 22 मे रोजी होणार आहे.
आयसीसीच्या परवानगीशिवाय प्रत्येक देश आपल्या संघात 25 मे पर्यंत बदल करू शकते. याच नियमाचा फायदा घेत पाकिस्तानने संघ घोषित करण्यास विलंब केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा मोहम्मद रिझवान, आझम खान, इरफान खान नियाझी आणि हॅरिस राऊफ यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांना काही छोट्या दुखापती झाल्या आहेत. त्यांचा फिटनेस आणि फॉर्म हा आगामी आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेत चाचपून पाहिला जाणार आहे.
इंग्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी पाकिस्तानने 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या मालिकेत वेगवान गोलंदाज हारिस राऊफ, अष्टपैलू खेळाडू हसन अली आणि सलमान अली आगा हे संघात परतले. तर फिरकीपटू उसमा मिर आणि वेगवान गोलंदाज झमान खान यांना वगळलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.