Pakistan Cricket Team Training: पाकिस्तान क्रिकेट संघाचे येत्या काही महिन्यातील वेळापत्रक बरेच व्यस्त आहे. आता त्यांना 18 एप्रिलपासून मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे.
त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध देखील मालिका खेळायच्या असून त्यानंतर जूनमध्ये टी२० वर्ल्डकपमध्येही पाकिस्तान संघ सहभागी होणार आहे. अशात या सामन्यांपूर्वी पाकिस्तानचा संघ मोठे कष्ट घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ आर्मी ट्रेनिंग घेतानाही दिसला.
नुकताच पाकिस्तान क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू आर्मीप्रमाणेच ट्रेनिंग करताना दिसत आहेत. ते वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ड्रिल करतानाही दिसत आहेत. हे ट्रेनिंग त्यांनी अबोटाबादमधील आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग येथे घेतली आहे.
या व्हिडिओमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरही दिसत आहे. त्याचबरोबर एक अँकर या ट्रेनिंगदरम्यान खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे.
त्याला हॅरिस रौफने सांगितले की तो काही आठवड्यातच गोलंदाजीला सुरुवात करेल. रौफला खांद्याची दुखापत झाली होती. याशिवाय शादाब खानला अँकरने विचारले की तो या कॅम्पचा आनंद घेत आहेस का? त्यावेळी तो मजेने उत्तर देतो की 'बिलकूल नाही'.
पाकिस्तान संघाच्या या ट्रेनिंग दरम्यानचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू मोठे दगड हातात घेऊन डोंगर चढत असल्याचेही दिसत आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नाकवी यांनी प्रसिद्धी पत्रकात पाकिस्तान आर्मीचे आभार मानले आहेत.
त्यांनी म्हटले की 'मी पाकिस्तान आर्मीने आमच्या क्रिकेटपटूंना दिलेल्या मदतीबद्दल मनापासून आभार मानतो. त्यांच्या मदतीचा उपयोग केवळ आमच्या खेळाडूंची फिटनेस लेव्हल वाढवण्यासाठीच नाही, तर त्यांना भविष्यात आणखी शिस्तप्रिय होण्यासाठीही होईल.'
'या कॅम्पचा उपयोग अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या आव्हानात्मक प्रवासासाठी होईल.'
यंदा 2 ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला 18 एप्रिलपासून न्यूझीलंड विरुद्ध 5 टी20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तान संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.