ENG vs PAK esakal
क्रिकेट

WTC 2023-25 Final : पाकिस्तान संघावर दुहेरी संकट; इंग्लंडकडून हरले अन् भारताला टक्कर देण्याचे स्वप्नही भंगले

Pakistan vs England 1st Test : पहिल्या डावात ५५६ धावा केल्यानंतरही पाकिस्तानही हार झाली. जो रूट व हॅरी ब्रूक यांनी अनुक्रमे द्विशतक व त्रिशतक झळकावून संघाला ८२३ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांवर गुंडाळून इंग्लंडने इतिहास रचला.

Swadesh Ghanekar

PAK vs ENG 1st Test WTC 2023-25 : कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करूनही डावाने पराभूत होणारा पाकिस्तान हा जगातला पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा डोंगर उभा केला. त्याला इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोघांनी वन डे स्टाईल फलंदाजी करताना ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाला पहिल्या डावात ७ बाद ८२३ धावा उभारून दिल्या. २६७ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांवर गडगडला आणि इंग्लंडने १ डाव व ४७ धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले.

अब्दुल्लाह शफिक ( १०२), शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४*) यांच्या शतकांनी पाकिस्तानला पहिल्या डावात ५५६ धावांपर्यंत पोहोचवले. जो रूट व हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचे कंबरडे मोडले. रूटने ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा केल्या आणि ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. ब्रूकने ३२२ चेंडूंत २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावांची वादळी खेळी केली.

दडपणाखाली गेलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात विकेट फेकल्या. गस अॅटकिन्सन आणि ब्रेडन कार्स यांनी चौथ्या दिवशी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जॅक लीचने चार विकेट्स घेतल्या. अब्रार अहमद जखमी असल्याने मैदानावर आला नाही आणि पाकिस्ताचा डाव २२० धावांवर गडगडला.इंग्लंडने हा सामना एक डाव व ४७ धावांनी जिंकला.

WTC मध्ये शेवटून पहिले...

या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. पाकिस्तान १६.६७ टक्केवारीसह तालिकेत शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आता त्यांचे फायनल खेळण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे. भारतीय संघ ७४.२४ टक्क्यांसह तालिकेतील अव्वल स्थान मजबूत करून बसला आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT