क्रिकेट

IRE vs PAK: बाबर आझम शुन्यावर आऊट झाला, पण T20I नेतृत्वात पहिला क्रमांक पटकावला; धोनी-रोहितलाही पछाडलं

Captain Babar Azam T20I Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एक मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घालताना एमएस धोनी, रोहित शर्मा, ओएन मॉर्गन अशा दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

Pranali Kodre

Captain Babar Azam T20I Record: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या युरोप दौऱ्यावर असून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (12 मे) डब्लिनला झाला. या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे.

याबरोबरच हा विजय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठीही विश्वविक्रमी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात हा विजय पाकिस्तानने मिळवला असल्याने आता तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने मिळवलेला हा 45 वा विजय ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात जिंकलेले हे सर्वाधिक सामने आहेत. त्यामुळे बाबर आझमने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी, रोहित शर्मा, ओएन मॉर्गन अशा दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

या सामन्यापूर्वी बाबर आझम आणि ब्रायन मसाबा हे 44 विजयांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर होते. परंतु, आता बाबरने पहिला क्रमांक पटकावला आहे.

आंततरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • 45 विजय - बाबर आझम (78 सामने)

  • 44 विजय - ब्रायन मसाबा (56 सामने)

  • 42 विजय - असगर अफगाण (52 सामने)

  • 42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने)

  • 41 विजय - रोहित शर्मा (54 सामने)

  • 41 विजय - एमएस धोनी (72 सामने)

पाकिस्तानचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयर्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 193 धावा केल्या होत्या.

आयर्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकरने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तसेच हॅरी टेक्टरने 32 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पाकिस्तानने 194 धावांचे लक्ष्य 16.5 षटकात 195 धावा करत पूर्ण केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळताना 46 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या आणि फखर जमाने 40 चेंडूत 78 धावांची खेळी केली. मात्र कर्णधार बाबर आझम या सामन्यात शुन्यावरच बाद झाला.

आयर्लंडकडून गोलंदाजीत मार्क एडेर, ग्रॅहम ह्युम आणि बेंजामिन व्हाईट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकला होता. तसेच आता दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे आता 14 मे रोजी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT