Pakistan Super League Ball boy Catch Video esakal
क्रिकेट

PSL Ball boy : बॉलबॉय असलो म्हणून काय झालं जलवा तर आपलाच! पाकिस्तानातील हा Video तुफान व्हायरल, टॅलेंट पाहून मुनरोही भारावला

PSL Ball boy Catch Video : पाकिस्तानात स्टार खेळाडूंपेक्षा बॉलबॉयच जास्त चांगली फिल्डिंग करतात. या व्हिडिओने हे सिद्ध करून दाखवलं.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Super League Ball boy Catch Video : टॅलेंट आहे हो फक्त संधी अन् व्यासपीठ मिळत नाही! हे वाक्य आपण खूपवेळा अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. मात्र टॅलेंट असेल तर संधी आपोआप निर्माण करता येते मग त्यासाठी अमुकच व्यासपीठ मिळायला हवं असं नाही. पाकिस्तान सुपर लीगमधील एक व्हिडिओ हीच शिकवण देऊन जात आहे.

पाकिस्तान सुपर लीगमधील एका बॉल बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये सगळा काही खेळ हा सीमारेषेच्या आत घडत असतो. या रिंगणात आपलं टॅलेंट दाखवायचं असेल तर त्यासाठी आधी संघात आणि मग प्लेईंग 11 मध्ये निवडलं जाणं गरजेचं आहे. मात्र पाकिस्तान सुपर लीगमधील हा पोरगा या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरला.

4 मार्चला पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडने रावळपिंडी येथील सामन्यात पेशावर जाल्मीचा 29 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात सर्व प्रकाशझोत हा एका बॉल बॉयने मिळवला. त्याने सीमारेषेबाहेर अशी काही जबरदस्त फिल्डिंग केली की कॉलिन मुनरोला देखील त्याला मिठी मारावीशी वाटली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सामन्याच्या 19 व्या षटकात आरिफ याकूबने रमन रईसच्या गोलंदाजीवर टोलेजंग फटका लगावला. यावेळी सीमारेषेवर असलेल्या कॉलिन मुनरोने हा उंच गेलेला चेंडू झेलण्यासाठी पुढे सरसावला. मात्र चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर होता.

चेंडू जरी मुनरोच्या आवाक्याबाहेर असला तरी तो बॉल बॉयने डाईव्ह मारत आपल्या आवाक्यात आणला अन् झेल टिपला. बॉलबॉयने जरी सीमारेषेबाहेर झेल पकडला असल्याने फलंदाज बाद होणार होता. यात संघाचा बॉल बॉयचा काहीच फायदा नव्हता. कारण बॉलबॉयचं काम हे फक्त सीमारेषेबाहेरील चेंडू आत फेकणं एवढंच होतं. मात्र हे काम करताना देकील त्या बॉल बॉयने आपलं टॅलेंट दाखवून दिलं.

यामुळेच आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी कधी अन् कशी येईल हे सांगता येत नाही. अशी अचानक आलेली संधी पटकन साधण्यासाठी तुम्ही फक्त तयार हवं. हा बॉल बॉय तयार होता. त्याने एकदा नाही तर दोनदा डाईव्ह मारून झेल पकडले. यामुळे तो अख्या जगात फेमस झालाय. मात्र या प्रसिद्ध करणाऱ्या क्षणामागे कित्येक दिवसांची मेहनत नक्कीच असणार. मेहनतीशिवाय असा झेल घेणं शक्य नाही हे मात्र नक्की!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT