Chris Woakes Catching Effort Sakal
क्रिकेट

PAK vs ENG: सूर्यासारखा कॅच घ्यायचा प्रयत्न झाला, पण पाकिस्तानी फलंदाजाला जीवदान मिळालं अन् मग शतक ठोकलं

Chris Woakes Catching Efforts Creates Controversy: इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने बाऊंड्री लाईनजवळ पाकिस्तानी खेळाडूचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे त्याने नंतर जीवदानाचा फायदा घेत शतक ठोकले.

Pranali Kodre

Pakistan vs England 1st Test: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सोमवारपासून (७ ऑक्टोबर) मुलतानला सुरू झाला असून यात पाकिस्तानी फलंदाजांनी वर्चस्व ठेवल्याचे दिसत आहे.

दोन्ही दिवसात पाकिस्तानची फलंदाजी पाहायला मिळाली असून तीन फलंदाजांनी शतकं ठोकली आहेत. यामध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या आघा सलमानचाही समावेश आहे. त्यानेही शतक ठोकले आहे. मात्र, त्याला हे शतक करण्याआधी जीवदान मिळाले होते.

झाले असे की सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सलमान १५ धावांवर खेळत असताना ११७ व्या षटकात जॅक लीच गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर सलमानने लाँग-ऑफला जोरदार शॉट खेळला.

त्यावेळी बाऊंड्री लाईनजवळ ख्रिस वोक्सने मागे झुकत चेंडू पकडल. पण त्याचा तोल जात असल्याने त्याने तो चेंडू वर फेकला आणि नंतर बाऊंड्रीच्या बाहेर तो गेला. त्यानंतर त्याने परत आत मैदानात उडी घेताना वर फेकलेला झेल पकडला.

मात्र यावेळी बाऊंड्री लाईन पार करताना त्याच्या हातात चेंडू आला तेव्हा त्याचा मागचा पाय बाऊंड्रीच्या बाहेर जमीनीला हलका स्पर्श करत असल्यासारखे रिप्लेमध्ये दिसले. त्यामुळे सलमानला नाबाद घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याला जीवदान तर मिळालेच, पण या चेंडूवर षटकारही गेला. तसेच सलामानने नंतर आक्रमक खेळताना शतकही ठोकलं. हे त्याचं तिसरं शतक ठरलं.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात १४९ षटकात सर्वबाद ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने १७७ चेंडूत १५१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले.

तसेच अब्दुल्ला शफिकने १८४ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. याबरोबरच सलमानने ११९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. सौद शकिलनेही ८२ धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून जॅक लीचने ३ विकेट्स घेतल्या. गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. ख्रिस वोक्स, शोएब बाशिर आणि जो रुट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT