AB de Villiers, Virat Kohli, Chris Gayle Sakal
क्रिकेट

RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

Pranali Kodre

Parthiv Patel on RCB: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ खेळत आहे. मात्र, गेल्या १७ वर्षात एकदाही त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

तीनवेळा बंगळुरू संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचले, परंतु, उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले. आता यामागे फ्रँचायझी काही मोजक्या खेळाडूंना अधिक महत्त्व देत असल्याने संघाचे नुकसान झाल्याचा दावा पार्थिव पटेलने केला आहे.

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल २०१४ साली आणि त्यानंतर २०१८ ते २०२० यादरम्यान बंगळुरू संघाकडून खेळला आहे.

दरम्यान, जेव्हा पार्थिव २०१४ साली या संघाचा भाग होता, त्यावेळी संघात कर्णधार विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलही होता. तसेच २०१८ ते २०२० मध्ये गेल या संघाचा भाग नव्हता. दरम्यान, पार्थिवने म्हटले आहे की या संघाने नेहमीच विराट, डिव्हिलियर्स आणि गेल यांना अधिक महत्त्व दिले.

पार्थिव सॉयरस सेज पॉडकास्टशी बोलताना म्हणाला, 'मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलो आहे, मी त्यांच्या संघात ४ वर्षे होतो. या संघात संघापेक्षाही नेहमीच विशिष्ट खेळाडूंना महत्त्व दिलं आहे. या संघातून बाहेर येणारा प्रत्येकजण हेच सांगेल.'

'जेव्हा मी संघात होतो, तेव्हा केवळ विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांना महत्त्व होते. त्यामुळे त्यांना विशेष प्राधान्य दिलं जायचं, त्यांच्याकडे सांघिक भावना कधीही नव्हती, हीच गोष्ट ते खेळतानाही दिसायची. त्याचमुळे ते कधीही ट्रॉफी जिंकू शकले नाहीत.'

पार्थिवने 2014 मध्ये बंगळुरूकडून 12 सामने खेळले असून 205 धावा केल्या होत्या. तसेच 2018 मध्ये 6 सामन्यांत 153 धावा, तर 2019 मध्ये 14 सामन्यांत 373 धावा त्याने केल्या होत्या. साल 2020 मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बंगळुरूकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट (8428 धावा), डिव्हिलियर्स (4522) आणि ख्रिस गेल (3420) अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT