Aleem Dar esakal
क्रिकेट

PAK vs ENG: इंग्लंडविरूद्धचा कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने केली ICC Umpire ची निवड समितीमध्ये नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Cricket Board: इंग्लंडविरूद्धचा पहिल्या कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर पाकिस्तानला लज्जास्पद पराभव पत्कारावा लागला आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानात खेळलेल्या मागील ११ सामन्यांपैकी एकही सामना जिंकलेला नाही. पाकिस्तान संघाच्या सततच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समितीमध्ये नव्या निवडकर्त्यांची नियुक्ती केली आहे. ज्यामध्ये आयसीसीचे निवृत्त पंच अलीम दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दार यांच्यासह माजी कसोटीपटू आकिब जावेद ,अझहर अली, हसन चीमा, यांनाही समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने राष्ट्रीय निवड समितीच्या निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला. युसूफच्या राजीनाम्यानंतर माजी कसोटी खेळाडू असद शफीक हे समितीवर कार्यरत होते.

एखाद्या बोर्डाकडून निवड समितीमध्ये पद मिळालेले दार हे पहिले पंच आहेत. दार यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून निवृत्ती जाहीर केली. ५६ वर्षीय दार यांनी आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून भूमिका बजावली आहे. पाकिस्तानच्या २०२४-२५ च्या हंगामातील देशांतर्गत सामन्यांच्या समाप्तीनंतर ते निवृत्ती घेणार आहेत. दार २००३ पासून आयसीसी अंपायर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीनवेळा 'आयसीसी अंपायर ऑफ द इयरसाठी' देण्यात येणारी 'डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी' जिंकली आहे.

पीसीबीने (PBC)गेल्या वर्षभरात दोन वेगवेगळ्या बोर्ड अध्यक्षांच्या अंतर्गत राष्ट्रीय निवड समितीमध्ये अनेक वेळा बदल केले आहेत. सुधारीत निवड समितीचे पहिले कार्य इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडणे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघांची निवड करणे हे असेल.

पाकिस्तानविरूद्ध इंग्लंड

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानने ५५६ धावा करून देखील पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन कसोटी सामने पाकिस्तानला जिंकावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळावा अन् पंकजा मुंडे... वारशाबद्दल धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Dussehra Melava 2024 Live Updates: "भगवा फडकणार, मशाल धगधगणार," ठाकरे गटाचा तिसरा टीजर जारी

Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या; आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer ०, पृथ्वी शॉ ७ अन् अजिंक्य रहाणे...; मुंबईची लागलीय वाट, ६ खेळाडू तंबूत परतले

Manoj Jarange: आचारसंहितेपर्यंत वाट पाहणार, न्याय मिळाला नाही तर... मनोज जरांगेंनी पुढची दिशाच सांगितली!

SCROLL FOR NEXT