PCB BCCI esakal
क्रिकेट

ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार... ICC मिटिंगसाठी पीसीबी करतय प्लॅनिंग?

ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र पाकिस्तानचं घोडं हे भारतावर येऊन अडतं.

अनिरुद्ध संकपाळ

ICC Champions Trophy 2025 PCB Seek Confirmation From BCCI : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र पाकिस्तानचं घोडं हे भारतावर येऊन अडतं. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास कायम नकार देत आला आहे. आशिया कपमध्ये देखील भारताच्या या भुमिकेमुळे पाकिस्तानला हाब्रीड पद्धतीने खेळावे लागले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान देखील असं होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी कंबर कसली आहे. ते बीसीसीआयकडून स्पर्धेतील सहभागाबाबत आधीच होकार मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पीसीबी चेअरमन दुबईत बीसीसीआयच्या आश्वासनासाठी करणार प्रयत्न

पीसीबीचे नवनियुक्त अध्यक्ष मोहसीन नक्वी पुढील आठवड्यात दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये नियोजित असताना, नक्वी यांनी या बैठकीसोबतच BCCI सचिव जय शाह यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आश्वासन मिळवण्याचा विचार केला आहे.

सरकारमुळे बीसीसीआयला निर्णय घेण्यात अडथळा

चॅम्पियन्स ट्रॉफीला अजून जवळपास एक वर्ष अवकाश असताना, बीसीसीआय पीसीबीला तात्काळ कोणतेही आश्वासन देण्याची शक्यता नाही. सुरक्षेची चिंता आणि भारत सरकारकडून मंजुरीची मिळणे हे दोन प्रमुख अडथळे आहेत.

सुरक्षेची हमी अद्यावर मैदानं...

पीसीबी बीसीसीआयकडून लवकरात लवकर आश्वानस मिळवण्यासाठी जोर लावत आहे. कारण जर दोन्ही बीसीसीआयने लवकरात लवकर आपला निर्णय कळवला तर तो दोन्ही बोर्डांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

त्यामुळेच नक्वी हे आयसीसी आणि बीसीसीआयला हा निर्णय लवकर घेणे कसे फायद्याचे ठरू शकते हे पटवून सांगण्यासाठी प्रयत्नशील असतील.

नक्वी हे आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयला पाकिस्तानात त्यांच्या सुरक्षेत कोणताही कसर ठेवण्यात येणार नाही याची खात्री देण्याची शक्यता आहे. नुकतेच पाकिस्तानात निवडणूक पार पडली आहे आणि नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. याचबरोबर कराची लाहोल आणि रावळपिंडी स्टेडियममधील सुविधा देखील अपग्रेड करण्यात आल्याचे ते सांगतली.

सरकार म्हणेल तसं!

पीसीबीने आयसीसी बैठकीत बीसीसीआयकडून आश्वासन मिळवण्यासाठी कितीही टाचा घासल्या तरी बीसीसीआय याबाबतीत सावध भुमिकाच घेईल. बीसीसीआय सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुासर पाकिस्तानात खेळण्याचा निर्णय हा फक्त भारतीय सरकार घेऊ शकते.

पुढच्या 2025 च्या फेब्रुवारी अन् मार्चमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी 2024 च्या मार्चमध्ये आश्वासन मागणं हे दिवासप्नच आहे असं देखील बीसीसीआय सूत्राने सांगितले.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT