ICC To Hand PCB Extra Money sakal
क्रिकेट

Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे पाकिस्तानात न जाणे शेजाऱ्यांच्या पथ्यावर पडणार; ICC ने दिले मोठे अपडेट्स

Swadesh Ghanekar

Champions Trophy 2025 India-Pakistan : चॅम्पियन्स ट्ऱॉफी २०२५ च्या बाबतीत एक मजेशीर बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि लाहोर स्टेडियमचेही नुतनीकरण सुरू आहे. पण, भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तामध्ये जाणार का, हा खरा प्रश्न आहे. BCCI ने संघ पाठवणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतल्याने आशिया चषक स्पर्धेप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याची शक्यता बळावली आहे. पण, यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय संघ पाकिस्तानात न येणं फायद्याचे ठरणार आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. त्यामुळे यजमान PCB ला आर्थिक नुकसान सहन करावा लागला. आता चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफी २०२५ साठीही हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. त्यानुसार भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंका येथे खेळवण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र, यावेळी PCB कडून कोणताच विरोध होताना दिसत नाही. त्यामागे कारणही तसेच आहे. भारताचे सामने पाकिस्तानबाहेर झाल्यास आयसीसी PCB ला आर्थिक मदत करणार आहे.

याचा अर्थ भारताचे पाकिस्तानात न येणे PCB च्या फायद्याचे ठरणार आहे. आयसीसीकडून त्यांना अतिरिक्त खर्च मिळणार आहे. त्यामुळे आशिया चषक २०२३ नुसार चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलमध्ये होईल याची शक्यता बळावली आहे.

भारताला मनवण्याची जबाबदारी आयसीसीची

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता BCCI ला पाकिस्तान दौरा करण्यासाठी मनवण्याची जबाबदारी आयसीसीकडे सोपवली आहे. PCB ने या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा आराखडा आयसीसीला दिला आहे. १९ फेब्रुवारी २०२५ पासून ही स्पर्धा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. २०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफीचे जेतेपद पाकिस्तानने पटकावले होते. त्यामुळे गतविजेते म्हणून ते पुढच्या वर्षी मैदानावर उतरतील. त्याचवेळी १९९६च्या वर्ल्ड कपनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

"पीसीबीने आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान या नात्याने जे आवश्यक होते, ते केले आहे. त्यांनी कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि स्वरूप सादर केले आहे. कार्यक्रमाचे बजेटही सादर केले आहे," असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT