R Ashwin in TNPL Sakal
क्रिकेट

R Ashwin Video: गोलंदाज अश्विनला तंबी द्यायला गेला मग काय... अण्णाने चतुराईने केली बोलती बंद

Pranali Kodre

R Ashwin gets run out warning at non-striker’s end: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा सध्या चालू आहे. या स्पर्धेत रविवारी (२८ जुलै) नेल्लई रॉयल किंग्स आणि दिंडिगुल ड्रॅगन्स संघात सामना झाला. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

झाले असे की या सामन्यात दिंडिगुल ड्रॅगन्स संघाच्या १५ व्या षटकात अश्विन नॉन स्ट्रायकरवर असताना गोलंदाज मोहन प्रसादने त्याला लवकर क्रीज सोडण्याबद्दल वॉर्निंगही दिली. यावेळी प्रसाद चेंडू टाकण्यासाठी येत होत. त्यावेळी अश्विन धाव घेण्याच्या विचारात होता. पण त्याने शेवटपर्यंत त्याची बॅट क्रीजमध्येच ठेवली होती.

त्यावेळी गोलंदाजाला तो पुढे जातोय असं वाटलं आणि तो थांबला. त्याने त्यावेळी त्याला वॉर्निंगही दिली. पण अश्विननेही त्याची बॅट क्रिजमध्येच असल्याचे इशाऱ्याने दाखवल्याचे दिसले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की 'ऍश आण्णा: ज्या शाळेत तू शिकलाय, त्याचा मुख्याध्यापक मी आहे.'

खरंतर नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्याबाबतची (मंकडिंग) चर्चा अश्विनमुळे अधिक झाली आहे. त्याने आयपीएल २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जॉस बटलरला अशाप्रकारने धावबाद केले होते.

तेव्हापासून असे धावबाद योग्य की अयोग्य अशी चर्चा झाली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयसीसीने नॉन-स्ट्रायकरला धावबाद करणे हे योग्य असल्याचे म्हटले आहे. याबद्दल नियमही करण्यात आलेला आहे.

रविवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, नेल्लई रॉयल्स किंग्सने ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा दिंडिगुल ड्रॅगन्स संघ १९.४ षटकात १३६ धावांवर सर्वबाद झाला.

त्यांच्याकडून शिवम सिंगने ७० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय फक्त अश्विनलाच दोन आकडी धावा करता आल्या. त्याने १५ धावा केल्या. नेल्लई रॉयल किंग्स संघाकडून गोलंदाजी करताना सोनू यादवने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग नेल्लई रॉयल्स किंग्सने १७.५ षटकात ६ विकेट्स गमावत १३८ धावा करत पूर्ण केला. त्याच्याकडून अरुण कार्तिकने ४५ धावा केल्या, तर कर्णधार अजितेश गुरुस्वामीने नाबाद ४३ धावा केल्या. दिंडिगुल ड्रॅगन्सकडून वरुण चक्रवर्ती आणि अश्विनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT