Rahul Dravid Son Samit play in T20 League  sakal
क्रिकेट

Samit Dravid Contract: राहुल द्रविडचा मुलगा, समित T20 लीगमध्ये खेळणार; 'या' फ्रँचायझीने मोजली मोठी रक्कम

Swadesh Ghanekar

Rahul Dravid Son Samit play in T20 League: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याने मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार सोडला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने पत्रकारांना गमतीने म्हटलेले की माझ्याकडे आता नोकरी नाही, काही असेल तर नक्की सांगा... राहुल द्रविड इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षकपद किंवा मेटॉर म्हणून दिसू शकतो. पण, तो कोणत्या फ्रँचायझीसाठी काम करेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच राहुलचा मुलगा समित द्रविड याला ट्वेंटी-२० लीगचे पहिले वहिले काँट्रॅक्ट मिळाले आहे.

राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड ( Samit Dravid) याला महाराजा ट्रॉफी KSCS T20 लीगमधील मैसूर वॉरियर्स ( Mysore Warriors) संघाने लिलावात आपल्या ताफ्यात घेतले आहे. मधल्या फळीचा फलंदाज आणि गोलंदाज असलेल्या समितसाठी वॉरियर्सने ५० हजार रुपये मोजले. ''समितला आमच्या संघात घेतल्याचा आनंद आहे, कारण त्याने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये त्याचं कौशल्य सिद्ध केलं आहे,''असे वॉरियर्स टीमच्या अधिकाऱ्याने सांगितले.

समितने कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचे कूच बिहार चषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते आणि या संघाने जेतेपदही पटकावले होते. त्याशिवाय तो KSCA च्या एकादश संघाकडून लँकशायर क्लबविरुद्ध खेळला होता.

वॉरियर्स हे मागील पर्वातील उपविजेते आहेत आणि करुण नायरच्या नेतृत्वाखाली त्यांनी यंदाच्या पर्वासाठी भारताचा जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला १ लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. फ्रँचायझीने नायरला रिटेन केले आहे.

मैसूर वॉरियर्स संघ- करुण नायर, कार्तिक सीए, मनोज भंडागे, कार्तिक एस यू, सुचिथ जे, गौथम के, विद्याधर पाटील, वेंकटेश एम, हर्षिल धर्मानी, गौथम मिश्रा, धनुष गोवडा, समित द्रविड, दीपक देवाडिगा, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जास्पर ईजे, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सर्फराज अश्रफ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT