Rajeev Shukla | India vs Bagladesh 2nd Test Sakal
क्रिकेट

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

Rajeev Shukla Viral Video during India vs Bangladesh 2nd Test: कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश संघात सुरु असलेल्या कसोटी सामना पाहण्यासाठी राजीव शुक्ला देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rajeev Shukla Viral Video: भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये होत आहे. हा सामना शुक्रवारी (२७ सप्टेंबर) सुरू झाला आहे. पण शनिवारी आणि रविवारी पावसामुळे सामन्यातील खेळ होऊ शकला नाही. पण सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी पूर्ण खेळ झाला.

दरम्यान, सोमवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील उपस्थित होते. दरम्यान, सामना सुरू असताना त्याच्याबाबत एक oops मुमेंट घडल्याचे दिसले.

झाले असे की राजीव शुक्ला इतर काही पदाधिकाऱ्यांसह सामना पाहात होते. त्यावेळी समोर असलेल्या टेबलवर असलेल्या डीशमधून ते काहीतरी खाताना दिसले. पण जसं त्यांच्या लक्षात आलं की कॅमेरा त्यांच्याकडे आलाय, तसं ते एकदम खुर्चीवर स्तब्ध बसले. त्यानंतर समोरून जाणाऱ्या वेटरलाही त्यांनी पटकन पुढे जाण्यासही सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चौथ्या दिवशी बांगलादेश आणि भारत दोन्ही संघांचा पहिला डाव संपला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने ७४.२ षटकात सर्वबाद २३३ धावा केल्या.

बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक १०७ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर सर्वोच्च धावा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने केल्या. त्याने ३१ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीप यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली.

त्यानंतर भारताने पहिला डाव ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावांनंतर घोषित केला. त्यामुळे भारताने ५२ धावांची आघाडी घेतली.

भारताकडून यशस्वी जैस्वालने ७२ धावांची खेळी केली, तर केएल राहुलने ६८ धावांची खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहलीने ४७, शुभमन गिलने ३९, रोहित शर्माने २३ धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तसेच हसन मेहमुदने १ विकेट घेतली.

यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावात ११ षटकात २ बाद २६ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT