Mumbai Ranji Trophy esakal
क्रिकेट

Ranji Trophy MUM vs BDA : ओम 'भट' स्वाहा! गतविजेत्यांचा लाजीरवाणा पराभव; पांड्याने मुंबईला हरवले

Swadesh Ghanekar

Ranji Trophy 2024-25 : गतविजेत्या मुंबई संघाला रणजी करंडक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत बडोदा संघाकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर असे भारतीय संघाकडून खेळणारे स्टार असूनही मुंबईच्या संघावर बडोदा संघ भारी पडला. गोलंदाज भार्गव भट याने ( Bhargav Bhatt) प्रभावी मारा केला. त्याने ६ विकेट्स घेतल्या. मुंबईकडून दुसऱ्या डावात सिद्धेश लाडने ५९ धावांची खेळी केली, परंतु त्याच्या विकेट्सने बडोद्याचा विजय निश्चित केला.

गतविजेत्या मुंबई संघाला रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बडोदा संघाकडून कडवी टक्कर मिळाली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बडोदाचा पहिला डाव मुंबईने २९० धावांवर गुंडाळला. मितेश पटेल ( ८६), ए शेठ ( ६६) व राज लिंबानी ( ३०) हे तळाचे फलंदाज खेळले नसते तर बडोदा संघ इथपर्यंत पोहोचलाही नसता. तनुष कोटियने ४ व शाम्स मुलानीने ३ विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा पहिला डाव २१४ धावांवर गडगडला आणि बडोद्याने ७६ धावांची आघाडी घेतली. मुंबईकडून पहिल्या डावात आयुष म्हात्रे ( ५२), हार्दिक तामोरे ( ४०), अजिंक्य रहाणे ( २९) व शार्दूल ठाकूर ( २७) यांनी चांगला खेळ केला होता.

मुंबईच्या हातून हा सामना निसटला असे वाटत असताना दुसऱ्या डावात गोलंदाजांनी कमाल केली. तनुषने २१-३-६१-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली आणि त्याला हिमांशू सिंगची ( ३-५०) साथ मिळाली. बडोद्याचा दुसरा डाव १८५ धावांवर गुंडाळून मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार कृणाल पांड्या ( ५५), महेश पिथिया ( ४०) व शेठ ( २६) यांनी बडोद्याला सावरले होते. पण, त्यांना आणखी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.मुंबईला २६२ धावांचे लक्ष्य मिळाले, पण...

पृथ्वी शॉ ( १२), आयुष ( २२), हार्दिक ( ६) व अजिंक्य ( १२) हे आघाडीचे चार फलंदाज अपयशी ठरले. श्रेयस अय्यर ( ३०) व सिद्धेश लाड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु भार्गव भटने या डावातील तिसरी विकेट घेताना अय्यरला माघारी पाठवले. भार्गवने पाठोपाठ शाम्स मुलानी ( १२), शार्दूल ठाकूर ( ८) यांना बाद करून मुंबईची अवस्था ७ बाद १३६ धावा अशी केली. जे के सिंगने मुंबईला मोठा धक्का देताना भरवशाचा फलंदाड तनुशला ( १) कॉट अँड बोल्ड केले आणि इथेच मुंबईच्या हातून मॅच पूर्णपणे गेली. मोहित अवस्थी ५ धावांवर बाद झाला, परंतु सिद्धेश दुसऱ्या बाजूने खिंड लढवत राहिला. त्याने षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. मुंबईचा दुसरा डाव १७७ धावांवर गुंडाळून बडोद्याने ८५ धावांनी विजय मिळवला. लाडने ९४ चेंडूत ६ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर बाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT