Abhimanyu Easwaran | Ranji Trophy Sakal
क्रिकेट

अभिमन्यू ईश्वरनचं सलग चौथं शतक; BCCI दुर्लक्ष करतेय अन् पठ्ठ्या मैदान गाजवतोय, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळणार का संधी?

Abhimanyu Easwaran century in Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत बंगालकडून खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनने खणखणीत शतक झळकावलं आहे. त्याने सलग चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक केले असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दावेदारी ठोकली आहे.

Pranali Kodre

Ranji Trophy 2024 News: भारतात सध्या रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत बंगाल संघाचा सामना उत्तर प्रदेशविरुद्ध झाला आहे. या सामन्यात बंगालसाठी २९ वर्षीय अभिमन्यू ईश्वरने शानदार कामगिरी करत शतक झळकावले आहे.

दुसऱ्या डावात बंगालसाठी अभिमन्यूने १७२ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद १२७ धावांची खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २७ वे शतक आहे. तसेच सलग चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने शतक केले आहे.

त्याने यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचे नेतृत्व करताना इंडिया सी विरुद्ध आणि इंडिया डी विरुद्ध शतक केले होते. तसेच त्याने इराणी कप स्पर्धेत शेष भारत संघाकडून १९१ धावांची खेळी केली होती. आता त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक केले आहे.

दरम्यान, अभिमन्यू सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. असे असताना त्याला न्यूझीलंडविरुद्ध १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात तिसरा सलामीवीर म्हणून संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र त्याला संधी मिळाली नाही.

आता त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही शतक करत पुन्हा एकदा आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दावेदारी ठोकली आहे. सध्या अभिमन्यूची स्पर्धा कसोटी संघात तिसरा सलमीवीराच्या जागेसाठी ऋतुराज गायकवाडबरोबर आहे.

ऋतुराजनेही महाराष्ट्राचे नेतृत्व करताना रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरविरुद्ध ८६ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तरी अभिमन्यू किंवा ऋतुराज यांना संधी मिळणार का हे पाहावे लागणार आहे. ऋतुराजला देखील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही.

दरम्यान, बंगालने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद ३११ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात सुदीप चॅटर्जीने ११६ धावा केल्या, तर सुदीप घरामीने ९० धावा ठोकल्या. पहिल्या डावात अभिमन्यू ५ धावांवर बाद झाला होता. उत्तर प्रदेशकडून यश दयाल आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर उत्तर प्रदेशचा दुसरा डाव ८९.४ षटकात २९२ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे बंगालला १९ धावांची आघाडी मिळाली. उत्तर प्रदेशकडून पहिल्या डावात आर्यन जुयालने ९२ धावांची खेळी, तर सिद्धार्थ यादवने ७३ धावांची खेळी केली. बंगालकडून या डावात मुकेश कुमार आणि शाहबाज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

यानंतर बंगालने दुसरा डाव अभिमन्यूच्या शतकाच्या जोरावर ३ बाद २५४ धावांवर घोषित केला आणि १९ धावांच्या आघाडीसह उत्तर प्रदेशसमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT