Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final Marathi News sakal
क्रिकेट

Ranji Trophy Final : मुंबईसाठी ४२ वे विजेतेपद आता हाकेच्या अंतरावर! श्रेयसचे शतक हुकले पण मुशिरने....

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबईसाठी ४२ वे रणजी विजेतेपद आता हाकेच्या अंतरावर आले आहे. तब्बल ५३७ धावांची आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी विदर्भसमोर इतिहासात कधीही न पार झालेला आव्हानाचा डोंगर उभा केला आहे.

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबईसाठी ४२ वे रणजी विजेतेपद आता हाकेच्या अंतरावर आले आहे. तब्बल ५३७ धावांची आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी विदर्भसमोर इतिहासात कधीही न पार झालेला आव्हानाचा डोंगर उभा केला आहे. विदर्भने बिनबाद १० अशी सुरुवात केली. मुशीर खानचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या ९५ धावा हे तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ठ ठरले.

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या रणजी सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पकड मिळवणाऱ्या मुंबईने त्यानंतर आपल्या विजयाची टक्केारी अधिक बळकट करताना विदर्भापासून सामना दूर नेला. अर्थात पुढच्या दोन दिवसांत विदर्भचे १० फलंदाज बाद करण्याचे काम शिल्लक आहे.

पहिल्या डावात ६ बाद १११ अशी घसरगुंडी उडताना केलेल्या चुका आज मुंबईकर फलंदाजांनी टाळल्या. या पहिल्या डावातील तारणहार आणि कदाचीत सामन्याला निर्णायक कलाटणी देणारा शार्दुल ठाकूर आज शुन्यावर बाद झाला तरी मुंबईची दुसऱ्या डावातील स्थिती भक्कम झाली याचे प्रमुख श्रेय शतकवीर मुशीर खान आणि श्रेयस अय्यर यांना आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी केली.

मुशीरचे संयमी शतक

काल २ बाद ३४ अशी संघाची अवस्था असताना मैदानात आल्यावर पडझड रोखण्याची मोठी जबाबदारी मुशीर खानवर होती. कर्णधार अजिंक्य रहाणेसह त्याने कालच नाबाद शतकी भागीदारी करुन आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला होता. आज त्यान ५१ धावांवरुन पुढची खेळी सुरु करताना त्याच्यावर कोणतेच दडपण नव्हते, पण मुंबईची आघाडी अधिकाधिक बळकट करण्यासाठी त्याने संयमाची कास सोडली नाही. २२५ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आणखी ३६ धावा जोडल्या.

रहाणेच्या ७३ धावा

या मोसमातील अखेरच्या सामन्यातील अखेरचा डाव खेळताना अजिंक्य रहाणेला सूर सापडला. आज त्यानेही ५८ धावांवरून खेळ सुरु केला, परंतु सकाळी अर्धातासाच्या आत तो एका अप्रतिम चेंडूवर ७३ धावांवर बाद झाला.

श्रेयसचे शतक हुकले

सर्व लक्ष पुन्हा एकदा श्रेयस अय्यरवर खिळले होते, पहिल्या डावात अवघ्या ७ धावा केल्यामुळे त्याच्याकडे ही अखेरची संधी होती. आता दडपण नसल्यामुळे त्याने आपल्या शैलीतील फटकेबाजी केली. विदर्भने त्याच्याविरुद्ध आखूड टप्याच्या चेंडूंचा सापळा लावला पण हे चेंडू बिनस्थातपणे हूक करण्याची आक्रमकता श्रेयसने दाखवली. ६२ चेंडूत अर्धशतक करणारा श्रेयस त्याच वेगात पुढे जात होता, परंतु ८५ नंतर तो सावध झाला. एकेरी-दुहेरी धावा घेत तो शतकाकडे मार्गक्रमण करत होता, परंतु ९५ धावांवर असताना त्याचा संयम सुटला आणि उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात हातातून बॅटही सुटली सोपा झेल गेल्यामुळे तो बाद झाला. पण दरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकारही मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT