Ravichandran Ashwin Most 5 Wickets Haul : भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 15.5 षटकात 51 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. याचबरोबर रविचंद्रन अश्विनने एक मोठ्या विक्रमाशी बरोबरी देखील केली. अश्विनने 99 कसोटीत आतापर्यंत 35 वेळा 5 विकेस्ट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो आता कुंबळे सोबत भारतीय कसोटी इतिहासात सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
आर. अश्विन तिसऱ्या कसोटीत सामना सोडून घरी परतला होता. कौटुंबीक कारणामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता. मात्र सामना सुरू असतानाचा पुन्हा परतला. ते दोन - चार दिवस त्याच्यासाठी तणावाचेच होते. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अश्विनला फार काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र दुसऱ्या डावात त्याने संघाला गरज असताना दमदार मारा करत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला.
अश्विनने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यात 35 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत तर 24 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर त्याने फलंदाजीत देखील दमदार कामगिरी करत 5 शतके आणि 14 अर्धशतके देखील ठोकली आहेत.
याचबरोबर अश्विन हा भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला आहे. त्याने या बाबतीत अनिल कुंबळे मागे टाकलं आहे. अनिल कुंबळने भारतात 350 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 351 विकेट्स घेत त्याला मागं टाकलं.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. त्याने 265 विकेट्स घेतल्या आहेत. तर कपिल देव यांनी भारतात 219 कसोटी विकेट्स घेतल्या असून ते ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर रविंद्र जडेजा 210 विकेट्स घेत पाचव्या स्थानावर आहे.
चौथ्या कसोटीबाबत बोलायचं झालं तर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावात गुंडाळला. भारताला विजयासाठी 192 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बिनबाद 40 धावा केल्या असून यशस्वी जैस्वाल 16 तर रोहित शर्मा 27 धावा करून नाबाद आहे. भारताला विजयासाठी अजून 152 धावांची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.