Ravichandran Ashwin sakal
क्रिकेट

Ravichandran Ashwin : १०० कसोटींचा स्वप्नवत प्रवास

इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे होणारा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विन याचा १०० वा कसोटी सामना आहे. १०० कसोटी खेळणे या ध्येयापेक्षा ते साध्य करताना केलेला प्रवास अधिक स्वप्नवत आहे, अशी भावना अश्विनने व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

धरमशाला : इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे होणारा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विन याचा १०० वा कसोटी सामना आहे. १०० कसोटी खेळणे या ध्येयापेक्षा ते साध्य करताना केलेला प्रवास अधिक स्वप्नवत आहे, अशी भावना अश्विनने व्यक्त केली. हा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा तर आहेच; पण त्यापेक्षा कसोटी जिंकण्याचे ध्येय अधिक मोठे असणार आहे, असे अश्विन म्हणाला.

क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि खूप काही शिकवले. कारकिर्दीच्या सुरुवातीला मला धक्के लागले. यश अपयशाच्या झोपाळ्यावर मला बसवले. एक काळ असाही होता, की मला भारतीय संघातून काढून टाकले जाणार होते. मी झालेल्या टीकेतून शिकत गेलो. सुधारणा करत गेलो म्हणून इथपर्यंत येऊ शकलो. बऱ्याच वेळा परदेशात कसोटी संघाची निवड होताना मला डावलले गेले पण दुसऱ्या बाजूला कोणाला घेतले गेले, तर रवींद्र जडेजाला ज्याने कमाल कामगिरी करून दाखवली आहे म्हणून मला त्याचा त्रास होत नाही, असे अश्विन म्हणतो.

फलंदाज म्हणून खेळणे चालू केलेल्या माझ्यासारख्या खेळाडूला ५०० कसोटी बळींचा टप्पा समाधान देत आहे. फलंदाज म्हणून मी सतत प्रयत्न करत राहिलो. तसेच सुधारणा केल्या सरावात. एक काळ मला ३० यार्डाच्या बाहेर चेंडू मारताना कठीण जायचे. सराव करून मी अत्यंत मोक्याच्या क्षणी षटकार मारण्याची कला अवगत केली. कसोटी सामन्यात शतके ठोकली. माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे. गोलंदाज म्हणून ज्यो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या तिघा भन्नाट फलंदाजांना गोलंदाजी करायचे आव्हान मला भावले आहे, असेही त्याने सांगितले.

कुटुंबीयांचा उत्साहच अधिक

माझ्यापेक्षा माझे कुटुंबीय माझ्या १००व्या कसोटीसाठी जास्त उत्साहात आहेत. खरे सांगायचे तर माझे आई-वडील, माझी पत्नी यांनी खूप त्याग केला आहे. माझे क्रिकेट चांगले व्हावे म्हणून मी या क्षणी त्यांच्या योगदानाचे मोल जास्त जाणतो आहे.

धरमशालाला खूप नाही, पण बऱ्यापैकी सामने मी खेळलो आहे. अर्थातच इतर वेळेपेक्षा यंदा मार्च महिन्यात जरा जास्त थंडी वाटते आहे. फिरकी गोलंदाज म्हणून चेंडूची पकड मिळवायला त्रास होणार आहे, असा अंदाज येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा केला खात्मा

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT