Ravindra Jadeja Rivaba Jadeja 
क्रिकेट

Ravindra Jadeja Wife : सर्व श्रेय पत्नीला! रविंद्र जडेजाने सामनावीराचा पुरस्कार पत्नी रिवाबाला केला समर्पित

Ravindra Jadeja Wife Rivaba : तिसऱ्या कसोटीत रविंद्र जडेजाने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली होती.

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Wife Rivaba Player of the Match : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील राजकोटच्या निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत आपण जगातील अव्वल दर्जाचा अष्टपैलू आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं.

भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत कसोटी क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा विजय मिळवला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 122 धावात गारद झाला. या डावात भारताचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजाने 5 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रविंद्र जडेजाने हा पुरस्कार पत्नी रिवाबाला समर्पित केला.

सामन्यानंतर रविंद्र जडेजाने सांगितले, रिवाबाने मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी मदत केली आहे. तिने शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या देखील मदत केल्याचे जडेजाने सांगितले. रविंद्र जडेजाने होम ग्राऊंडवर जिंकलेला सामनावीराचा पुरस्कार पत्नीला समर्तिप केला.

जडेजा म्हणाला की, 'दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्याने मनात एक विशेष भावना आहे. एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणं हे खास आहे.'

'माझ्या घरच्या मैदानावरचा हा सामनावीराचा पुरस्कार खास आहे. मी तो माझ्या पत्नीला समर्पित करतोय. पडद्यामागं ती मला मानसिक पाठबळ देते. ती कायम माझा आत्मविश्वास वाढवत असते.'

रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने पाच विकेट्स घेत इंग्लंडचा डाव 122 धावात गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 430 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान होते. जडेजाच्या फिरकीपुढे इंग्लंडने सपशेल शरणागती पत्करली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT