India vs Bangladesh, 2nd Test at Kanpur: भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (२७ सप्टेंबर) कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सुरू झाला. पावसामुळे उशीराने सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
सुरुवातीला बांगलादेशचे सलामीवीर झाकिर हसन आणि शादमन इस्लाम हे भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध संयमी खेळ करताना दिसले. बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात २१ धावा केल्या आणि ते जलदगती गोलंदाजांचा चांगला सामना करताना दिसले.
त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने ८व्या षटकात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानंतर ९व्या षटकात वेगवान गोलंदाज आकाश दीपने बांगलादेशला पहिला धक्का दिला. यशस्वी जैस्वालने चौथ्या स्लिपला जाकिर हसनचा ( ०) सुरेख झेल टिपून बांगलादेशला २६ धावांवर धक्का दिला.
आकाशने त्याच्या पुढच्या षटकात मोठी विकेट मिळवली. शादमन इस्लामला ( २४) त्याने १३ व्या षटकात पायचीत पकडले. पण पंचांनी आधी त्याला नाबाद दिले. त्यामुेळे DRS घेण्यासाठी आकाश आग्रही होता. त्याने कर्णधार रोहित शर्माला DRS घेण्यासाठी मनवले.
त्यानंतर रिप्लेमध्ये बेल्स उडताना पाहून रोहितला आश्चर्याचा धक्का बसला. रिव्ह्युमध्ये स्पष्ट दिसले की शादमन बाद होता. त्याची विकेट पाहून फक्त रोहितच नाही, तर भारतीय संघातील सर्वच खेळाडू अत्यंत खुश झाले. या विकेटचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे चेन्नईमध्ये २८० धावांनी विजय मिळवलेल्या पहिल्या सामन्यातील ११ खेळाडूच भारतीय संघाकडून कानपूरमध्येही खेळताना दिसणार आहेत.
पहिल्या सामन्यात भारताने विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता कानपूरमध्ये विजय मिळवून बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताकडे आहे. बांगलादेशला मालिका पराभव टाळण्यासाठी कानपूर कसोटीत विजय मिळवावाच लागेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.