Rinku Singh Sakal
क्रिकेट

IND vs BAN: गंभीर-सूर्याचा फ्री-हँड, आक्रमक खेळण्याचा मिळालेला मेसेज; रिंकू सिंगचा खुलासा

Rinku Singh on Suryakumar Yadav and Gautam Gambhir: रिंकू सिंगने खुलासा केला आहे की गौतम गंभीर, सूर्यकुमार यादवकडून मनसोक्त खेळण्याला पसंती दिली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

India vs Bangladesh T20I: नितीशकुमार रेड्डीने ७४ धावांची व रिंकू सिंगने ५३ धावांची खेळी करीत भारताच्या बांगलादेशवरील दुसऱ्या टी२० सामन्यातील विजयात मोलाचा वाटा उचलला. टीम इंडियाला टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेता आली. याप्रसंगी रिंकू सिंगने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार सूर्यकुमार यादवचे कौतुक केले.

रिंकू सिंग याप्रसंगी म्हणाला, गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव यांच्याकडून आम्हाला संदेश देण्यात आला की, परिस्थिती कोणतीही असो तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ करा. मारते जाओ बॉल को... आक्रमक फलंदाजी करण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला. मनाजोगती फलंदाजी करण्याला त्यांच्याकडून पसंती देण्यात आली.

रिंकू सिंग पुढे सांगतो की, मला ज्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात येते, त्या क्रमांकावर वेगवेगळ्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. याआधी एकेरी, दुहेरी धावा काढण्याकडे माझे लक्ष असायचे. वाईट चेंडूंवर आक्रमक फलंदाजी करायचो. तसेच, अखेरची दोन ते तीन षटके शिल्लक असल्यास चौकार व षटकार मारण्यावर जोर द्यायचो.

सुरुवातीला संयम बाळगला

रिंकू सिंग नवी दिल्लीतील टी-२० लढतीबाबत म्हणाला, सुरुवातीला चेंडू बॅटवर सहजपणे येत नव्हते. संजू सॅमसन व सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर नितीशकुमार रेड्डी म्हणाला, चेंडू थांबून बॅटवर येत आहे. त्यानंतर आम्ही सुरुवातीला संयम बाळगला. एकेरी धावा करण्याकडे लक्ष दिले. नितीशकुमारने षटकार मारायला सुरुवात केली आणि तेथून फलंदाजीचा नूर बदलून गेला.

आता रणजी क्रिकेटला प्राधान्य

रिंकू सिंग याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कसोटी, टी-२० व एकदिवसीय अशा तीनही प्रकारांमधून मी खेळू शकतो. स्वत:ला मी तशाप्रकारे सज्ज ठेवले आहे. आता रणजी मोसमाला सुरुवात होणार आहे. मला संधी मिळाल्यास प्रत्येक प्रकारात खेळत राहीन.

भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम : तस्कीन अहमद

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याने भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळाचे कौतुक केले. तो म्हणाला, भारतीय क्रिकेटपटू हे फक्त मायदेशात अव्वल दर्जाचे नाहीत, तर जगामध्ये सर्वोत्तम आहेत. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आमच्यापेक्षा चांगला खेळ त्यांच्याकडे करण्याची क्षमता आहे.

भारतीय संघ सातत्याने १८० ते २०० धावा करीत असतो. आम्हाला आमच्या देशामध्ये १३० ते १४० धावांपर्यंत मजल मारता येते. आमच्या येथील खेळपट्ट्या भारतासारख्या नाहीत. आगामी काळात यामध्ये सुधारणा झाल्यास आम्हालाही १८० ते २०० धावा करता येऊ शकतील. तसेच, प्रतिस्पर्ध्यांना रोखता येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT