Mohammad Hafeez Pakistan Cricket : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद हाफीजच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम त्यांनाही स्थान मिळाले आहे.
बाबर आझमकडे संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर प्रथमच पाकिस्तान संघ मालिका खेळणार आहे. या संघाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने एक पोस्ट शेअर केली आहे.
18 एप्रिलपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी पीसीबीने संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 17 सदस्यीय संघात तरुणांना संधी न दिल्याने पीसीबीचा माजी संचालक मोहम्मद हाफीज चांगलाच संतापला. हाफिजने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. मोहम्मद हाफीजने X वर लिहिले की, 'RIP पाकिस्तान डोमेस्टिक क्रिकेट.' यावरून हाफीजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधल्याचे स्पष्ट आहे.
डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात हाफिजने पाक क्रिकेट संघाचा संघ संचालक आणि अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले होते. तथापि, 2024 पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचे तब्बल 4 वर्षानंतर पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आमिर पाकिस्तान संघाचा भाग असू शकतो. आमिरने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप संघात निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले होते. हे पाहता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याचे पुनरागमन झाले आहे. आमिरसोबतच पीसीबीने निवृत्त अष्टपैलू इमाद वसीमचीही टी-20 मालिकेसाठी संघात निवड केली आहे. वसीमचेही वर्ल्ज कप खेळणे जवळपाल निश्चित आहे.
इमाद वसीमने नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अलीकडेच त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली. पीएसएलमधील इमादची उत्कृष्ट कामगिरी पाहून पीसीबीने त्याला निवृत्तीतून परत बोलावले. पीएसएलमध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यात इमादची महत्त्वाची भूमिका होती. फायनलमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.