Rishabh Pant Sakal
क्रिकेट

IND vs BAN: वेलकम बॅक Rishabh Pant! वादळी शतक पाहून स्टेडियममधील आज्जीही भारावल्या, पाहा Video

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st Test: भारतीय संघ जवळपास दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरला असून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये सुरू असून या सामन्यातून यष्टीरक्षक ऋषभ पंतचेही कसोटीत पुनरागमन झाले आहे.

२०२२ च्या अखेरीस कार अपघातानंतर गेली २० महिने त्याला कसोटी क्रिकेट खेळता आले नव्हते. पण आता तो पूर्ण तंदुरुस्त असून त्याने २० महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करताना शतकी खेळीही केली.

बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी भारताने दुसऱ्या डावात रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला शुभमन गिल आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी चांगली भागीदारी केली.

एक बाजू शुभमन गिल सांभाळत असतना दुसऱ्या बाजूने पंत आक्रमक खेळ करत होता. त्याने ८० धावांचा टप्पा पार केल्यानंतरही त्याने आक्रमक खेळ केला. त्याने १२४ चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले.

त्याने हे शतक पूर्ण केल्यानंतर बॅट उंचावून सेलिब्रेशनही केले. यावेळी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले, तसेच विराट कोहली बाऊंड्री लाईनच्या बाहेर उभा राहून पंतचे कौतुक करताना दिसला. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधले, ते स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या एका आज्जींनी.

पंतने शतक केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी हात उंचावून जोरजोरात टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. त्यांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

पंतचे हे कसोटीतील सहावे शतक ठरले. त्यामुळे त्याने भारताकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत एमएस धोनीची बरोबरी केली. धोनीनेही ६ शतके केली आहेत. तसेच तो सर्वात कमी डावात ६ शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजही ठरला. त्याने ५८ डावात ६ शतके केली आहेत.

दरम्यान, पंत शतक केल्यानंतर मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर शुभमन गिलनेही त्याचे शतक पूर्ण केले. गिल आणि पंत यांच्यात १६७ धावांची भागीदारी झाली.

दरम्यान गिलच्या शतकानंतर काही वेळाने भारताने दुसरा डाव ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. गिलने १७६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११९ धावांची खेळी केली. तसेच केएल राहुल १९ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी केली.

भारताने पहिल्या डावात २२७ धावांची आघाडी घेतलेली असल्याने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या. तसेच बांगलादेशला पहिल्या डावात सर्वाबाद १४९ धावाच करता आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

SCROLL FOR NEXT