Rishabh Pant IPL 2024 Update : इंडियन प्रीमियर लीग 2024 थरार काही दिवसात रंगणार आहे. यामध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंत गेल्या हंगामात खेळला नव्हता, कारण त्याच्या कार अपघात झाला होता. पंत यावर्षी पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्याआधी दिग्गज खेळाडू ऋषभ पंतच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आगामी हंगामासाठी त्याला अद्याप दिल्ली कॅपिटल्सने संघाचा भाग बनवला नाही. त्याचप्रमाणे, त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही मिळालेले नाही.
दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, पंतला एनसीएकडून 5 मार्च रोजी फिटनेस प्रमाणपत्र मिळेल. परंतु एनसीएने त्याला प्रमाणपत्र दिलेले नाही.
30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. आयपीएल 2024 मध्ये तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती परंतु यावर सस्पेन्स दिसत आहे.
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पंतला फिटनेस टेस्ट पास करावी लागली होती. पण त्याला क्लिअरन्स मिळू शकला नसल्याची बातमी आता समोर आली आहे. पंतची फ्रँचायझी टीम दिल्ली कॅपिटल्सने त्याचा फिटनेस अहवाल बीसीसीआयकडे मागितला होता.
पण त्यांना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आयपीएल 2024 पंतच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जेव्हा त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी या वृत्ताचे खंडन केले नाही. आणि फ्रँचायझीला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
वृत्तानुसार, फिटनेस क्लिअरन्सअभावी पंतला त्याच्या फ्रेंचायझीने संघात स्थान दिलेले नाही. पंत खेळला नाही तर दिल्ली संघाला मोठा धक्का बसू शकतो. संघाचा शेवटचा हंगाम चांगला राहिला नव्हता. यावेळी पंतकडून खूप अपेक्षा होत्या. पंत आयपीएलमध्ये खेळू शकणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.