Rishabh Pant Jay Shah esakal
क्रिकेट

Rishabh Pant T20 World Cup : जर तो विकेटकिपिंग करू लागला तर... जय शहा ऋषभ पंतच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याबद्दल काय म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant T20 World Cup : डिसेंबर 2022 मध्ये गाडीला अपघात झाल्यापासून ऋषभ पंत गेले 15 मिहिने क्रिकेटपासून दूर आहे. पंत आयपीएल 2024 मध्ये पहिल्यांदा व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. पंतच्या फिटनेसबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माहिती दिली. याचबरोबर त्याच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आज सांगितले की ऋषभच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत. तो कसा पुनरागमन करतो याचे मुल्यमापन केलं जाईल. जर पंत पूर्णपणे फिट झाला असेल तर त्याचा टी 20 वर्ल्डकपच्या संघासाठी नक्की विचार केला जाईल.

पीटीआयशी बोलताना जय शहा म्हणाले की, 'तो फलंदाजी चांगली करतोय. तो किपिंग देखील चांगली करतोय. आम्ही त्याला लवकरच फिट घोषित करू. जर तो आमच्यासाठी टी 20 वर्ल्डकप खेळला तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.'

शहा पुढे म्हणाले की, 'जर तो विकेटकिपिंग करू शकला तर तो वर्ल्डकप खेळले. तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतोय हे पाहू.' पंतचा डिसेंबर 2022 मध्ये मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात त्याच्या गुडघ्याला मोठी इजा झाली होती. त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. तसेच घोटा आणि मनटग देखील फ्रॅक्चर होते.

इतक्या इंज्युरीनंतर देखील ऋषभ पंत मैदानावर परतला असून तो आयपीएलमध्ये आपला फिटनेस सिद्ध करून दाखवेल. त्याची फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी आधीच पंत हा लीगसाठी तयारी करत असल्याचं सांगितलं आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT