Rishabh Pant Sakal
क्रिकेट

ICC Rankings: ऋषभ पंतने पुनरागमन गाजवलं! कसोटी क्रमवारीतही विराट-रोहितलाही मागे टाकत टॉप-१० मध्ये मिळवलं स्थान

Rishabh Pant return to top ten Test batting rankings: आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक करणाऱ्या ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.

Pranali Kodre

ICC Test Rankings: भारतीय क्रिकेट संघाने नुकताच चेन्नईला झालेल्या कसोटी सामन्यात रविवारी बांगलादेशविरुद्ध २८० धावांनी मोठा विजय मिळवला. तसेच श्रीलंकेनेही न्यूझीलंडविरुद्ध गॉलला झालेला कसोटी सामना सोमवारी जिंकला.

या सामन्यांनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऋषभ पंतला मोठा फायदा झाला आहे.

भारताकडून चेन्नई कसोटीतून ऋषभ पंतने २० महिन्यांनंतर पुनरागमन केले. पण अपघातानंतर पूर्ण तंदुरुस्त होऊन पहिल्यांदाच कसोटी खेळायला उतरलेल्या पंतने त्याचा जुना फॉर्मच कायम ठेवला आहे. त्याने दुसऱ्या डावात १०९ धावांनी दमदार खेळी केली. त्याने पहिल्या डावातही यशस्वी जैस्वालबरोबर अर्धशतकी भागीदारी केली होती.

त्याच्या या कामगिरीमुळे आता त्याने पुन्हा एकदा पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं आहे. पंत ७३१ रेटिंग पाँइंटसह आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. तसेच यशस्वी जैस्वालनेही पहिल्या डावात ५६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तोही पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

याशिवाय दुसऱ्या डावात ११९ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या शुभमन गिलनेही ५ स्थानांची उडी घेत १४ वा क्रमांक मिळवला आहे. मात्र पहिल्या कसोटीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना मोठा तोटा झाला आहे.

रोहितची ५ स्थानांनी घसरण झाली असून तो आता १० व्या क्रमांकावर आला आहे, तर विराटची देखील ५ स्थानांनीच घसरण झाली आहे. त्यामुळे तो टॉप-१० मधून खाली आला आहे. तो आता १२ व्या क्रमांकावर आहे.

फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन दुसऱ्या आणि डॅरिल मिचेल तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. पहिल्या क्रमांकावर जो रुट आहे. श्रीलंकेच्या कामिंडू मेंडिसनेही चांगली प्रगती केली अशून तो आता १६ व्या क्रमांकावर आला आहे.

गोलंदाजांच्या यादीत चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेणारा आर अश्विन अव्वल क्रमांकावर कायम आहे, तर जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच चेन्नई कसोटीत ५ विकेट्स घेणारा रविंद्र जडेजा एक स्थानाने वर आला असून आता ६ व्या क्रमांकावर आला आहे.

याबरोबरच न्यूझीलंडविरुद्ध गॉल कसोटीत ९ विकेट्स घेणाऱ्या श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्यानेही ५ स्थानांची मोठी झेप घेत टॉप-१० मध्ये स्थान मिळवलं आहे. तो आता ८ व्या क्रमांकावर आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा आणि आर अश्विन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. अष्टपैलूंच्या यादीत श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाने मोठी झेप घेत १८ वे स्थान मिळवले आहे.

अफगाणिस्तानच्या गुरबाजची गरुडझेप

दरम्यान, नुकतीच अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकली. या मालिकेत ७ वे शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा फलंदाज रेहमनुल्लाह गुरबाज याने १० स्थानांची झेप घेत आता वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत आठवे स्थान मिळवले आहे. तो टॉप-१० मध्ये पोहचणारा अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज आहे. याबरोबरच ट्रेविस हेडनेह ७ स्थानांची झेप घेतली असून नववा क्रमांक मिळवला आहे.

वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीतही अफगाणिस्तानच्या राशिद खानने तब्बल ८ स्थानांनी उडी मारत तिसरे स्थान मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT