Rishabh pant Sakal
क्रिकेट

Rishabh Pant: 'तेल लगाओ डाबर का, विकेट लो बाबर का...', भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी पंत हे काय बोलला?

Pranali Kodre

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन संघातील सामन्याची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. या दोन संघात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामनेही झाले आहेत. दोन्ही संघ या सामन्यात जिंकण्यासाठी जीवाची बाजीही लावतात.

या दोन संघात गेल्या काही वर्षात राजकीय तणावामुळे फारसे क्रिकेट सामने होताना दिसत नाही. 2013 नंतर गेल्या 11 वर्षात दोन संघात द्विपक्षीय मालिकाही झालेल्या नाहीत, त्यामुळे हे दोन संघ फक्त आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात.

त्याचमुळे चाहत्यांना या दोन संघात होणारा सामना पाहण्याची संधी वर्ष-दोन वर्षातून एकाददोनवेळा मिळते. अशात चाहते मिळालेल्या संधीचा फायदा घेत या सामन्याचा आनंद घेतात.

यावेळी एक प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांना आणि खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करतात. याचबद्दल ऋषभ पंतने नुकतेच भाष्य केले आहे.

दरम्यान, सामन्यावेळी काही चाहते मस्करीत नारेबाजीही करतात. काही चाहते पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मस्करीत 'तेल लगाओ डाबर का, विकेट लो बाबर का' अशा प्रकारच्या घोषणाही देतात. याच घोषणेचा उल्लेखही पंतने केला आहे.

त्याने इंडिया टीव्ही शोवरील आप की आदालतमध्ये मुलाखत देताना सांगितले की 'जर आपण खेळाडूंच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर पाकिस्तानचे खेळाडूही त्यांच्या देशासाठी मेहनत घेत असतात.'

'पण अशा प्रकारची मस्ती होत राहते. मजेशीर गोष्ट अशी की दोन्ही देशातील चाहत्यांना अनेक भावना व्यक्त होत असतात. चाहते काही घोषणा देतात, जसे की 'तेल लगाओ डाबर का, विकेट लो बाबर का', अशा घोषणेमुळे स्पर्धा आणखी रोमांचक होते.'

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन संघात आता टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी (9 जून) सामना रंगणार आहे. हा सामना न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होणार आहे.

या सामन्यादरम्यान ऋषभ पंतही भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT