Delhi Capitals Rishabh Pant IPL 2025 sakal
क्रिकेट

Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार? IPL 2025 पूर्वी मोठी उलथापालथ

Kiran Mahanavar

Rishabh Pant Leaving Delhi Capitals : आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अजून सात-आठ महिने आहे पण आताच चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होऊ शकतो. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो अशी बातमी समोर येत आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वीच पंत आपल्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो. याआधी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगनेही दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीला दणका दिला आहे. पॉन्टिंगने डीसीसोबत 7 वर्षे काम केलं होते, मात्र त्याच्या जाण्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त झाले आहे.

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स सोडणार?

कार अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये मैदानात परतला. परत येताच त्याने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफमध्ये नेण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स सोडली.

असे सांगितले जात आहे की, ऋषभ पंत आणि रिकी पाँटिंग खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचे कारण म्हणजे पंत देखील हा मोठा निर्णय घेऊ शकतात. पंत 2016 पासून दिल्ली संघाशी जोडला आहे आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर त्याला 2021 मध्ये कर्णधारपद देण्यात आले. तेव्हापासून तो दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. पंतने दिल्ली सोडली तर साहजिकच मेगा लिलावात त्याच्यावर करोडो रुपयांची बोली लावली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT