Rohit Sharma  esakal
क्रिकेट

Anant Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग! मुंबई इंडियन्सचा 'माजी' कर्णधार रोहितही पोहचला जामनगरमध्ये

Rohit Sharma In Anant Radhika Pre Wedding : रोहित शर्माचं अनंत अन् राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याला जाणं बरच काही सांगून जातं. सोहत रितिका देखील आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Anant Radhika Pre Wedding Rohit Sharma : मुकेश अंबानीचे सर्वात छोटे सुपूत्र अनंत अंबानी आणि प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचे प्रीवेडिंग जामनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील सेलिब्रेटी जामनगर येथे दाखल होत आहेत. शुक्रवापासून सुरू झालेलं हे प्रीवेडिंग तीन दिवस सुरू राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी हॉलीवूड, बॉलीवूडच्या कलाकारांसह अनेक क्रिकेटपटूंनीही देखील उपस्थिती दर्शवली आहे. यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या देखील उपस्थित राहिले. मात्र सर्वांची नजर एकाच व्यक्तीवर खिळली. तो म्हणजे रोहित शर्मा! (Cricket News In Marathi)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत जामनगरमध्ये प्रीवेडिंग सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. आज मुंबई इंडियन्सचा दुसरा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव, जहीर खान देखील जामनगरमध्ये पोहचले होते. सूर्यकुमार यादव हा 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो मुंबईचा एक महत्वाचा खेळाडू आहे.

याचबरोबर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान देखील जामनगरमध्ये दाखल झाला आहे. जहीर खान हा पत्नी सागरिका घाटगे सोबत उपस्थित आहे.

सध्या बीसीसीआयचा वार्षिक करार रद्द झाल्याने चर्चेत असलेला इशान किशन देखील अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याला उपस्थित आहे. इशान किशनने आपली आयपीएल कारकीर्दच मुंबई इंडियन्सपासून सुरू केली आहे. तो अजूनही मुंबई इंडियन्सचा एक महत्वाचा खेळाडू आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT