Rohit Sharma deletes his recent social post sakal
क्रिकेट

Rohit Sharma : रोहित शर्माच्या फोटोवरून गदारोळ! सोशल मीडियावरून पोस्ट केली डिलीट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Kiran Mahanavar

Rohit Sharma deletes his recent social post : टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. श्रीलंकेसोबतच्या वनडे मालिकेत रोहित टीम इंडियाचा कर्णधार असेल. सध्या ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे.

रोहितने मंगळवारी सराव सत्रादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यातील एक फोटो काही वेळात व्हायरल झाला आणि रोहितला ट्रोल केले जाऊ लागले, ज्यामुळे कॅप्टनला त्याची अलीकडील पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली.

रोहितने का केली पोस्ट डिलीट?

भारत आणि श्रीलंका यांच्यात 30 जुलै रोजी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने सराव करतानाचे काही फोटो शेअर केले होते. काही वेळानंतर बीसीसीआयने खेळाडूंच्या सराव सत्राची फोटोही सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये रोहित शर्माचाही फोटो होता. इथून हा सगळा खेळ सुरू झाला आणि भारतीय कर्णधाराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले.

चाहत्यांचा म्हणण्यानुसार, रोहितने त्याचे एक फोटो एडिट करून शेअर केले होते आणि त्यामध्ये त्याने पोट कमी केले होते, तर बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहितच्या पोटाचा आकार मोठा दिसत होता. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर यूजर्सनी रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर रोहितने त्याची पोस्ट डिलीट केली.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका दोन ऑगस्टपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर वनडे मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन करत आहेत. रोहित शर्माला या मालिकेत विशेष कामगिरी करण्याची सुवर्णसंधी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT