Rohit Sharma Viral Video Sakal
क्रिकेट

आबरा का डाबरा! Rohit Shrama ने सामना सुरू असताना केली बेल्सची अदलाबदल; Video Viral

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st Test: भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फलंदाजी आणि नेतृत्वामुळे चर्चेत असतोच, पण बऱ्याचदा तो मैदानावर करत असलेल्या मजेशीर गोष्टींमुळेही चर्चेत येतो.

रोहित मैदानात असताना सतत काहीतरी करताना किंवा काहीतरी बोलताना दिसतो. त्याच्या काही कमेंट्स देखील यापूर्वी व्हायरल झाल्या आहेत.

आता त्याचा भारत विरुद्ध बांगलादेश संघातील चेन्नई कसोटी दरम्यानचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. चेन्नई कसोटीत भारताने २८० धावांनी विजय मिळवला होता.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसले की चेन्नई कसोटीतील चौथ्या दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना मध्येच रोहित शर्माने येऊन स्टंपवरील बेल्सची आदला-बदली केली.

यावेळी त्याच्याकडे काहीशा आश्चर्याने तिथून जात असलेल्या ऋषभ पंत आणि केएल राहुलने पाहिले. बेल्सच्या आदलाबदलीनंतर रोहित पुन्हा क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा राहिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, अशाप्रकारे सामन्यात स्टंपवरील बेल्सची आदला-बदली करणारा रोहित काही पहिलाच खेळाडू नाही. यापूर्वी विराट कोहली, स्टूअर्ट ब्रॉड यांनीही अशाप्रकारची कृती केली आहे.

चेन्नई कसोटीबद्दल सांगायचे झाले, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या. भारताकडून आर अश्विनने ११३ धावा केल्या, तर रविंद्र जडेजान ८६ धावा आणि यशस्वी जैस्वालने ५६ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून हसन मेहमुदने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर बांगलादेशला पहिल्या डावात केवळ १४९ धावाच करता आल्याने भारताने २२७ धावांची आघाडी घेतली. पण भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेत दुसऱ्या डावात फलंदाजी केली.

दुसरा डाव भारतीय संघाने ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. या डावातही भारताकडून शुभमन गिलने नाबाद ११९ आणि ऋषभ पंतने १०९ धावांची शतकी खेळी केली. भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघ ६२.१ षटकात २३४ धावांवरच सर्वबाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

Israel-Hezbollah Conflict: इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 लोक ठार, 300 हून अधिक जण जखमी

Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स; खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी

SCROLL FOR NEXT