Rohit Sharma esakal
क्रिकेट

Rohit Sharma IND vs ENG : कॅप्टन असावा तर असा! शतक ठोकत द्रविडशी केली बरोबरी... मात्र मान दिला गिलला

Rohit Sharma IND vs ENG : रोहित शर्मा अन् शुभमन गिलने शतकी खेळी करत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पुढे नेले. पहिल्या सत्रावर भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Equals Rahul Dravid Record India Vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिले सत्र रोहित शर्मा आणि शुभमन गिलने गाजवले. रोहितने सावध खेळत आपले 12 वे कसोटी शतक पूर्ण केले. तर शुभमन गिलने आक्रमक फटकेबाजी करत रोहितच्या आधी आपले चौथे कसोटी शथक पूर्ण केलं.

पहिल्या सत्राअखेर भारताच्या 264 धावा झाल्या असून संघाकडे 46 धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे. दरम्यान, या शतकी खेळीनंतर रोहित शर्माने भारताचा प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. जरी रोहित अन् शुभमन गिलने शतकी खेळी केली असली तरी सत्र संपल्यावर पॅव्हेलियनमध्ये जाताना रोहितने शुभमन गिलला लिड घेण्यास सांगितले.

रोहितने केली द्रविडशी बरोबरी

  • रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्यात द्रविडशी बरोबरी केली.

  • या यादीत पहिल्या स्थानावर 100 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे.

  • विराट कोहली 80 शतकांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

  • मात्र रोहित शर्मा आणि राहुल द्रविड प्रत्येकी 48 शतकांसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे रोहित शर्माने आपली तिशी पार केल्यानंतर 35 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. 2019 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या सलामीवीरांमध्ये रोहित शर्माचे अव्वल स्थान आहे.

2019 नंतर सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारे सलामीवीर

  • रोहित शर्मा - 9 शतके

  • दिमुथ करूणारत्ने - 8 शतके

  • डेव्हिड वॉर्नर - 5 शतके

  • टॉम लॅथम - 5 शतके

  • उस्मान ख्वाजा - 5 शतके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT