Rohit Sharma Press Conference T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट

Rohit Sharma T20 WC 24 : रोहितनंही विराटचा कित्ता गिरवला, प्रश्न हसण्यावारी नेला! पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Press Conference T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवड झाल्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवडसमिती प्रमुख अजित आगकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. रिंकू सिंह, केएल राहुल, चार फिरकीपटू अशा अनेक प्रश्नांची गांभीररित्या उत्तर दिलं. मात्र ज्यावेळी विराट कोहलीचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा हसू लागला.

असाच किस्सा हा टी 20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचा पाकिस्तानने 10 विकेट्सने पराभव केला होता त्यावेळी झाला होता. ज्यावेळी पत्रकारांनी रोहित शर्माच्या टी 20 कारकिर्दीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी विराट कोहली जोरजोराने हासू लागला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघातील सध्याचे महान खेळाडू आहेत. या दोघांमधील समन्वय हा मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील दिसतो.

आजच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी रोहित शर्माने देखील प्रश्न हसण्यावारी नेत विराटच्या बद्दल अशी कोणतीच चर्चा नसल्याचं सांगितलं.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्याचे दिसून येते. रोहित शर्मा आणि विराट यांच्यातील बाँडबद्दल अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. आयपीएलमध्ये देखील हे दोघे एकमेकांची चेष्टा करताना दिसले होते.

दरम्यान, अजित आगरकरने केएल राहुलला संघात का घेतलं नाही याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अजित आगरकरने सांगितले की, 'अजित आगरकर म्हणाला की राहुल हा सध्या वरच्या फळीत फलंदाजी करतोय. आम्हाला मधल्या फळीत फलंदाजी करणारा फलंदाज हवा आहे. केएल राहुल हा दर्जेदार खेळाडू आहे यात कोणती शंका नाही.'

आगरकर पुढे म्हणाला की, 'मला वाटतं की मधल्या फळीत ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे चांगली कामगिरी करत आहेत. ते आमच्या कॉम्बिनेशनसाठी योग्य आहेत.'

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT