Team India | Gautam Gambhir - Rohit Sharma Sakal
क्रिकेट

IND vs NZ: टीम इंडियाची प्लेइंग-११ पहिल्या कसोटीसाठी कशी असणार? रोहित सांगितला प्लॅन

Pranali Kodre

India vs New Zealand 1st Test: भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला बुधवारपासून यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना सकाळी ९.३० वाजता बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होत आहे.

ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचे देखील सावट आहे. त्यामुळे अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची हे ठरवले नसल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी रोहितने भारतीय संघ कशा प्लेइंग इलेव्हनसह पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार यावर त्याने भाष्य केले.

त्याने हे स्पष्ट केले की किमान २ फिरकीपटू घेऊन भारतीय संघ खेळेल. पण परिस्थिती पाहून तिसऱ्या फिरकीपटूलाही खेळवायचे की नाही याचा निर्णय सामन्याआधी घेतला जाईल.

रोहित म्हणाला, 'सर्वकाही हवामानावर अवलंबून आहे. आज सकाळी पाऊस पडत होता. खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले आहेत. आम्ही उद्या सकाळी निर्णय घेऊ की प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे की दोन वेगवान गोलंदाज खेळवायचे. आम्ही याबाबत पर्याय खुला ठेवला आहे.'

भारताने यापूर्वी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जवळपास अडीच दिवस पावसाचा अडथळा आला होता.

असे असतानाही रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत अडीच दिवसात विजय मिळवला होता. पण असे असले तरी भारताचा फलंदाजीबाबत एकच दृष्टीकोन असणार नाही, असे रोहितने स्पष्ट केले. सामन्याच्या परिस्थितीनुसार दृष्टीकोन बदलत राहिल, असं तो म्हणाला.

रोहित म्हणाला, 'आम्ही पाहू की दिवस कसे जाणार आहे, त्यानंतर निर्णय घेऊ. कानपूरमध्ये आम्हाला दोन दिवस खेळता आले नव्हते. त्यानंतर आम्ही विजयाचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला होता. मला माहित नाही, इथे काय होणार आहे. आम्ही आमच्या पुढ्यात काय येईल त्यानुसार निर्णय घेऊ. तरी आम्ही सामने जिंकण्याचाच प्रयत्न करू.'

दरम्यान, रोहितने असेही स्पष्ट केले आहे की वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सध्या गुडघ्याची दुखापत आहे. त्याच्या गुडघ्याला सुज आहे. त्यामुळे त्याच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे. भारताला नोव्हेंबरमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

"मामापासून लपून केलेलं वोटिंग ते बिग बॉसचा रनर अप" ; पृथ्वीक प्रतापचं अभिजीत सावंतसाठी खास पत्र ; "सुरजशी तो मायेने..."

Aditya Thackeray on Election: “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो....”; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंमध्ये दिसला उत्साह

Latest Maharashtra News Updates : झारखंड निवडणूक 2024 च्या CEC बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले

SCROLL FOR NEXT