IND vs BAN esakal
क्रिकेट

IND vs BAN, 3rd T20I: टीम इंडियाची 'Power'! संजू सॅमसनची खतरनाक बॅटींग, सूर्याची फटकेबाजी, रेकॉर्ड ब्रेकिंग खेळ

IND vs BAN 3rd T20I Match : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील अंतिम ट्वेंटी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने तब्बल २९७ धावा उभारल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

IND vs BAN 3rd T20I Match : भारत आज (१२ ऑक्टोबर) हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील अंतिम ट्वेंटी-२० सामना खेळत आहे. या सामन्यात सुरवातीपासून भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. संजू सॅमसनने ४० चेंडूतच जलद शतक झळकावले. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने धमाकेदार अर्धशतक केले.

संजू व सूर्याच्या जोडीने केवळ २२ चेंडूमध्ये ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यांच्या वादळी खेळामुळे भारतासाठी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. भारताने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ८२ धावा पूर्ण केल्या. ज्यामध्ये संजू व सूर्यासोबतच अभिषेक शर्माच्या ४ धावांचेही योगदान आहे. या धावसंख्येने २०२१ मधील स्कॉटलंडविरुद्धच्या २ बाद ८२ धावांच्या विक्रमाची बरोबरी केली.

सर्वाधिक ट्वेंटी-२० धावांचा विक्रम

भारताने या सामन्यात एकूण २९७ धावा उभारल्या आणि आणखी एक विक्रम रचला आहे. ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा नेपाळ नंतर भारत दुसरा संघ ठरला आहे. नेपाळ ने याआधी मँगोलियाविरुद्ध ३१७ धावा केल्या आहेत.

भारतीय फलंदाजांनी डावात धमाकेदार कामगिरी केली ज्यामध्ये संजू सॅमसनने ११ चौकार व ८ षटकारांसह १११ धावा करत शतक झलकावले. तर कर्णधार सूर्याकुमार यादवने ७५ धावांची अर्धशतकीय खेळी केली. रियान परागने १३ चेंडूत ३३ धावा केल्या. तर, हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावा जोडल्या.

तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी प्लेइंग-११

भारत - संजू सॅमसन(यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.

बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT