Saud Shakeel and Mohammad Rizwan's All-run Four Sakal
क्रिकेट

PAK vs BAN, Video: बाऊंड्री पार न होताही पाकिस्तानच्या रिझवान-शकिलने संघासाठी काढल्या चार धावा, पाहा नक्की झालं काय?

Pranali Kodre

Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना बुधवारी (२१ ऑगस्ट) रावळपिंडी येथे सुरू झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात मोठ्या धावा उभारल्या आहेत. पहिल्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी शतकी खेळी केल्या.

दरम्यान, क्रिकेटमध्ये बऱ्याचदा एकेरी - दुहेरी धावा बऱ्याचदा फलंदाज धावतात. कधीकधी तिहेरी धावाही निघतात. क्रिकेटमध्ये साधारण चेंडू सीमापार गेला की चार आणि सहा धावा मिळतात. पण एकाच चेंडूवर फलंदाजांनी चार धावा पळून काढल्याची घटना तशी दुर्मिळच. असं खूप कमी वेळा घडलं आहे.

अशीच ही दुर्मिळ घटना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान घडली. सौद शकिल आणि मोहम्मद रिझवान यांनी पळून ४ धावा काढल्या. ही घटना पाकिस्तानचा पहिला डाव सुरू असताना ४९ व्या षटकात घडली.

बांगलदेशकडून नाहिद राणा गोलंदाजी करत होता. त्याने वेगात चेंडू टाकला, ज्यावर शकिलने मिड-ऑफच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षक शोरुफूल इस्लामने सूर मारत तो चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू आडला नाही. पण चेंडूची गती कमी झाली.

त्यानंतर तो चेंडू सीमापार गेला नाही, पण तो चेंडू नजमुल हुसैन शांतोने परत आणेपर्यंत रिझवान आणि शकिलला इतका वेळ मिळाला की ते चा धावा धावून पूर्ण करतील. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने पहिला डाव ११३ षटकात ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला. सौद शकीलने २६१ चेंडूत १४१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार मारले. तसेच मोहम्मद रिझवानने २३९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली. तसेच सईम आयुबने ५६ धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून शोरुफूल इस्लाम आणि हसन मेहमूद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मेहदी हसन मिराज आणि शाकिब यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशने १२ षटकात बिनबाद २७ धावा केल्या. शादमन इस्लाम १२ धावांवर नाबाद राहिला, तर झाकीर हसनने ११ धावांवर नाबाद राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT