Charlie Cassell world record sakal
क्रिकेट

विश्वविक्रम! Charlie Cassell ने वन डे पदार्पण गाजवले; जसप्रीत बुमराहलाही हे नव्हते जमले

Charlie Cassell world record : आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणात एकाही गोलंदाजाला असा पराक्रम यापूर्वी करता आला नव्हता. स्कॉटलंडच्या गोलंदाजाने कागिसो रबाडाचाही विक्रम मोडला.

Swadesh Ghanekar

Scotland Charlie Cassell World Record : स्कॉटलंडचा गोलंदाज चार्ली कॅसेल याने सोमवारी ICC Men's Cricket World Cup League 2 स्पर्धेच्या लढतीत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ओमानविरुद्धच्या या सामन्यात चार्लीने ३४ चेंडूंत सामन्याला कलाटणी दिली आणि विश्वविक्रमी कामगिरी केली. आतंरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये एकाही गोलंदाजाला पदार्पणात जे आतापर्यंत करता आले नव्हते ते स्कॉटलंडच्या खेळाडूने करून दाखवले. त्याच्या या अविश्वसनीय स्पेलमुळे स्कॉटलंडने १७.२ षटकांत हा वन डे सामना जिंकला.

चार्ली कॅसेलने सोमवारी स्कॉटलंडकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आपलं नाव क्रिकेटच्या इतिहास पुस्तिकेत नोंदवले. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने कागिसो रबाडाचा पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा विक्रमही मोडला. ओमानविरुद्धच्या लढतीत चार्लीने ५.४ पैकी १ षटक निर्धाव टाकून २१ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला वन डे पदार्पणात ७ विकेट्स घेता आल्या नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध १६ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापूर्वी २००३ मध्ये वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्ड्सने झिम्बाब्वेविरुद्ध २२ धावांत ६ विकेट्स घेतलेल्या.

Charlie Cassell

संलग्न देशाकडून पुरुषांच्या वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी

  • ७/१८ - राशिद खान ( अफगाणिस्तान) वि. वेस्ट इंडिज, २०१७

  • ७/२१ - चार्ली कॅसेल ( स्कॉटलंड) वि. ओमान, २०२४

  • ७/३२ - अली खान ( अमेरिका) वि. जर्सी, २०२३

चार्ली कॅसेल हा या स्पर्धेसाठी स्कॉटलंड संघाचा सदस्य नव्हता, परंतु ख्रिस सोल याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आणि चार्लीची एन्ट्री झाली. त्याने पहिलाच सामना गाजवला. ओमानचा संघ २ बाद ४९ अशा सुस्थितित असताना चार्लीला गोलंदाजीसाठी आणले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर ओमानचा माजी कर्णधार झीशान मक्सूदला पायचीत केले. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो ३२ वा गोलंदाज ठरला.

कॅसेल इथे थांबणारा नव्हता आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर अयान खानची विकेट घेतली आणि वन डे पदार्पणात पहिल्या दोन चेंडूंवर दोन विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. दोन चेंडूनंतर त्याने खालिद काईल आणि शोएब खान यांची विकेट घेतली. त्याने पहिला स्पेल १.३-१-०-४ असा टाकला.

Charlie Cassell world record

मेहराने त्याला खणखणीत षटकार खेचला, परंतु कॅसेलने त्याची विकेट घेऊन पाच विकेट्सचा पल्ला गाठला. पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो जगातील १५वा गोलंदाज ठरला. सलामीवीर प्रतिक ( ३४) आठवले हा खिंड लढवत होता, परंतु कॅसेलने त्याची विकेट घेतली. पदार्पणात ६ विकेट्स घेणाता तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी फिडेल एडवर्ड्स व कागिसो रबाडा यांनी असा पराक्रम केला होता.

पण, कॅसेल इथेच थांबला नाही आणि सातवी विकेट घेऊन इतिहास रचला. ओमानचा संपूर्ण संघ २१.४ षटकांत ९१ धावांत तंबूत परतला आणि स्कॉटलंडने १७.२ षटकांत २ बाद ९५ करून विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT